वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ ! केंद्र सरकारचं मोठ वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘भारतरत्न’ पुरस्कार सावरकरांना द्यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. भाजपने देखील आपल्या जाहीरनाम्यात आम्ही सावरकरांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे म्हंटले होते. संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. यादरम्यान संसदेत सावरकरांना भारतरत्न देण्यासाठीच्या एका प्रश्नाचे उत्तर देण्यात आले आहे.

सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत शिफारस आली आहे का असे संसदेने विचारले असता, अशा शिफारसीने भारतरत्न दिला जाऊ शकतो असे उत्तर केंद्र सरकारने दिले. त्याचप्रमाणे भारतरत्न शिफारसीशिवाय सुद्धा दिले जाऊ शकते असे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत अनेकांचा विरोध देखील आहे. प्रामुख्याने त्यात काँग्रेसचा विरोध मोठ्या प्रमाणावर आहे. भारतरत्न पुरस्कार देताना याचा संबंध कोणत्याही समितीशी नसतो हा पुरस्कार थेट पंतप्रधान कार्यालयाच्या निगडित असतो आणि यासाठी कोणाच्याही शिफारसींची गरज नसते. सन्मानासाठी योग्य असलेल्या व्यक्तीला सरकारकडून हा पुरस्कार दिला जातो.

काय म्हणाले सावरकरांचे कुटुंबीय
आम्ही कधी अशा प्रकारच्या सन्मानाची मागणी केलेली नाही परंतु असा सन्मान होत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करू असे मत सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांनी व्यक्त केले आहे.

Visit : Policenama.com