आधी ‘असा’ दिसायचा ‘लॉलीपॉप लागेलू’चा सिंगर सुपरस्टार पवन सिंह ! ओळखूही येत नाही, जाणून घ्या काही रोचक किस्से

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भोजपुरी इंडस्ट्रीचा किंग म्हणवला जाणारा सुपरस्टार पवन सिंह (Pawan Singh) गेल्या काही दिवसांपासून आपल्या गाण्यांमुळं चर्चेत येत आहे. ज्या सिनेमात किंवा गाण्यात पवन सिंह असतो ते गाणं किंवा सिनेमा आधीच सुपरहिट मानला जातो. चाहतेही त्याच्यासाठी क्रेजी आहेत. आज आपण पवन सिंहचे कधीही न पाहिलेले फोटो पाहणार आहोत. इतकंच नाही तर काही किस्सेही जाणून घेणार आहोत.

सध्या सोशलवर पवन सिंहचे अनेक जुने फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. यात तो ओळखूही येत नाही. अनेकांना तर विश्वासही होत नाही की, तो पवन सिंह आहे. सध्या पवन लंडनमध्ये त्याच्या एका सिनेमाची शूटिंग करत आहे.

पवनच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर 2014 मध्ये त्यानं नीलमसोबत लग्न केलं होतं. परंतु एका वर्षानंतर नीलमनं आत्महत्या केली. पवनवर तिच्या खुनाचा आरोप लागला होता. 2018 साली पवननं ज्योती सिंह सोबत दुसरं लग्न केलं.

पवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर पवन सिंहनं सिंगर म्हणून करिअरला सुरुवात केली होती. त्याचा पहिला अल्बम ओढनिया वाली 1997 साली आला होता. परंतु त्याला ओळख मिळाली ती लॉलीपॉप लागेलू गाण्यामुळं. या गाण्याला एवढं यश मिळालं की, पवन सिंह रातोरात स्टार झाला. पवननं 2007 साली आलेल्या रंगली चुनरिया तोहरे नाम या सिनेमातून भोजपुरी सिनेमात डेब्यू केला होता. पवनला इंटरनॅशनल भोजपुरी फिल्म अवॉर्ड्समध्ये बेस्ट मेल सिंगरचा अवॉर्ड मिळाला आहे. 2017 मध्ये पवननं राजकारणात पाऊल टाकलं होतं. तो भाजप सदस्य बनला होता.

 

You might also like