नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – वर्ल्ड कप २०१९ दरम्यान भुवनेश्वर कुमारला दुखापत झाली असताना त्यानंतर त्याने पुनरागमन केले, पण त्याला परत स्पोर्ट हर्निया म्हणून गंभीर दुखापत झाली. ही दुखापत बरी होण्यास बरेच महिने लागले आणि त्याने भारतीय टीम मध्ये पुनरागमन केले, पण कोरोना व्हायरसमुळे सिरीज रद्द केली गेली. अशात भुवनेश्वर कुमारने आपल्या घरात वेळ घालवत असून यादरम्यान त्याने खुलासा केला आहे कि त्याच्या पत्नीने त्याचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक केले होते.
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे की, त्याची पत्नी नुपूर नागरने एकदा त्याचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक केले होते आणि त्यानंतर त्याने कधीच त्याचे अकाउंट वापरले नाही. तसेच त्याने अनेक किस्सेही शेअर केले आणि आपल्या नात्यासंबंधित अनेक खुलासेही केले.
नुपुरने मला विचारला होता पासवर्ड- भुवी
भुवी म्हणाला की, “तिने मला एकदा फेसबुक पासवर्डबाबत विचारले होते, पण मी कारण दिले होते. नंतर दुसऱ्या दिवशी तिने मला सांगितेले कि हा माझा नवीन पासवर्ड आहे. तिने खरंच माझे अकाऊंट हॅक केले होते आणि त्यानंतर मी फेसबुक वापरले नाही.” तर लहानपणीची मैत्रीण आणि आता जोडीदार बनलेल्या नुपूरने म्हटले की, जेव्हा कोणती महिला फॅन भुवीला चिकटते, ते मला आवडत नाही.
पेशाने इंजिनियर असलेल्या नुपूरने म्हटले की, “जेव्हा तो फिमेल फॅनसह फोटो काढतो तेव्हा मी त्याला सांगते कि त्यांच्यापासून अंतर ठेव. तू तिला सांगू शकत नाही का कि जवळ उभी राहू नको आणि तेव्हा तो म्हणतो कि मी काय करू जेव्हा कोणी माझ्या जवळ उभं राहत.” याशिवाय नुपूरने हाही खुलासा केला की, हॉस्टेलमध्ये तिच्या मैत्रिणी भुवीचे कौतुक करत होत्या, पण कोणाला आमच्याबद्दल माहित नव्हते.