‘त्या’ सर्व प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत : अशोक चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये राजीनामा देण्याचे सत्र चालू झाले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शिवली असून देशात जिथं-जिथं काँग्रेसला अपयश आलंय, तेथील प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत असं मतही त्यांनी व्यक्त केलंय. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलतांना अशोक चव्हाण यांनी वरील मत व्यक्त केलं आहे.

देशात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या प्रमाणात पराभवाचा सामना करावा लागला. राज्यातही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. काँग्रेसला तर केवळ एकच जागा मिळाली. त्यासोबतच कॉग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. खुद्द अशोक चव्हाण यांचा नांदेड लोकसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला. भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांनी त्यांचा ४० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. या पराभवाची जबाबदारी म्हणून अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

You might also like