रेड झोनमध्ये बदलले ’Bigg Boss 14’चे घर, वाइल्ड कार्डसोबतच 3 एलिमिनेटेड कन्टेस्टंट्स परतणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   ’बिग बॉस’च्या घरात त्यावेळी मोठा गोंधळ उडाला, जेव्हा अचानक सायरन वाजू लागला आणि घरात पीपीई सूट घातलेल्या काही लोकांची एंट्री झाली. त्या लोकांनी अचानक सर्व सामानाची उलथा-पालथ करण्यास सुरवात केली.

मेकर्सने येणार्‍या एका एपिसोडचा नवा प्रोमो रिलीज केला आहे, ज्यामध्ये पीपीई किट घातलेल्या लोकांची एंट्री आणि लागोपाठ वाजत असलेल्या सायरनमुळे घरातील लोक घाबरतात. बिग बॉसच्या घराला रेड झोन घोषित केले जाते आणि ते लोक घर सील करू लागतात.

रेड झोन बनले घर, एरिया केला सील

आता खरी गोष्ट काय आहे, हे तर पुढील एपिसोडमध्येच समजणार आहे. परंतु, अंदाज आहे की, आज रात्रीच्या एपिसोडमध्ये म्हणजे 21 ऑक्टोबरला बिग बॉसच्या घरात काही वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. बातमी ही सुद्धा आहे की, बेघर करण्यात आलेल्या कंटेन्स्टंटपैकी काहीजण पुन्हा बिग बॉसच्या घरात परतू शकतात.

बेघर झाले हे कंटेस्टंट

आतापर्यंत ज्या कंटेस्टंटना बेघर करण्यात आले आहे, त्यामध्ये पवित्रा पूनिया, एजाज खान, शहजाद देओल आणि सारा गुरपाल आहेत. सारा गुरपालबाबत काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की, तिची वाईल्ड कार्ड एन्ट्री होऊ शकते. माजी बिग बॉस कंटेस्टंट विंदू दारा सिंहने सुद्धा इंटरव्ह्यूत अशी शक्यता वर्तवली होती.

वाईल्ड कार्ड एंट्रीसोबत 3 एलिमिनेटेड कंटेस्टंट परतणार!

जे सेलेब्स वाईल्ड कार्ड एंट्री करणार आहेत, त्यांच्यात नैना सिंह, शार्दुल पंडित, प्रतीक सहजपाल, सपना सप्पू उर्फ सपना भाभी आणि अ‍ॅक्ट्रेस रश्मी गुप्ताचे नाव आहे. बिग बॉसशी संबंधीत माहीती देणार्‍या ’द खबरी’नुसार, बिग बॉसच्या घरात आता 7 सदस्यच बाकी आहेत. एका टास्कनंतर घरात 21 ऑक्टोबरला वाईल्ड कार्ड किंवा 3 एलिमिनेटेड कंटेस्टंटची एंट्री होऊ शकते.