महाराष्ट्रातही जंगलप्रेमी युवराजने भ्रष्ट काँग्रेसशी युती केली; भाजपने शिवसेनेवर डागली तोफ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिहार विधानसभा निवडणूक निकालावरून पुन्हा एकदा राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना टोलेबाजी करत आहेत. शिवसेनेनंतर आता भाजपने पलटवार केला असून, यासंदर्भात भाजप नेते आशिष शेलार यांनी दोन ट्विट केले आहेत.

त्यामध्ये भ्रष्टाचारी काँग्रेससोबत सलगी केलेल्या जंगलराज का युवराजला बिहारच्या जनतेने नाकरले. आता महाराष्ट्रातपण भ्रष्टाचारी काँग्रेससोबत जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज युती करून बसलेत. समजनेवाले को इशारा काफी है अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये काँगसने महाराष्ट्रात हातात धनुष्यबाण धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला, आता महाराष्ट्रातसुद्धा जनतेच्या घड्याळाचे काय सांगावे टायमिंग…? पंचायत ते पार्लमेंट मॅन ऑफ द मॅच पंतप्रधान नरेंद्र मोदीच ! त्यांच्यासह नितीश कुमार, देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन त्यांनी केलं आहे.