बिल गेट्स देतील 35 लाख रुपये, तुम्हाला फक्त फोनमध्ये करावं लागेल ‘हे’ काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माइक्रोसॉफ्टचे मालक असलेले बिल गेट्स यांना कोण ओळखत नाही, मात्र आता हेच बिल गेट्स तुम्हाला पस्तीस लाख रुपये देणार आहेत, त्यासाठी तुम्हाला त्यांचे एक महत्वाचे काम पूर्ण करावे लागणार आहे. जाणून घेऊयात नक्की हे काम कशा संदर्भात आहे. भारतामध्ये Smartphoneचे खूप मोठे मार्केट आहे. तारीही आज देशातील पन्नास कोटी लोक साधा फिचर फोन वापरात आहेत. अशी माहिती एका कंपनीच्या अहवालात समोर आली आहे. त्यामुळे सहाजिकच स्मार्ट फोन वापरणारे डिजिटल पद्धतीने आपले पेमेंट करत आहेत मात्र सध्या फिचर फोन वापरणाऱ्यांना डिजिटल प्रणालीचा लाभ घेता येत नाहीये.

अशात तुम्हाला सध्या फिचर फोनसाठी देखील एक पेमेंट सिस्टीम तयार करायची आहे. नेशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) नुसार फिचर फोनच्या माध्यमातून *99# डाइल करून खूप कमी म्हणजेच पाच लाख व्यवहार होत आहेत. कारण फिचर फोनच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट करणे सोपे नाही. अशातच NPCI ने CIIE.CO बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन सोबत भागीदारी केली आहे. यासाठी एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्याचे नाव ग्रँड चॅलेंज पेमेंट युजींग फिचर फोन ( Grand Challenge Payments Using Feature Phones ) आहे. ही स्पर्था फिचर फोनसाठी डिजिटल पेमेंट करण्यासाठी आहे आणि ही सिस्टीम बनवणाऱ्याला 35 लाखांपर्यंतचे बक्षीस मिळणार आहे.

या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2020 आहे. 14 मार्च 2020 रोजी विजेते घोषित केले जाईल. या स्पर्धेत निवडलेल्या स्पर्धकांना 11 फेब्रुवारी 2020 पासून एनपीसीआय एपीआय मध्ये प्रवेश असेल. याशिवाय एनपीसीआयचे तज्ञही यासाठी तुम्हाला मदत करतील. या स्पर्धेतील पहिले बक्षीस 50 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 35,84,275 रुपये, दुसरे 21,50,565 रुपये आणि तिसरे 14,33,710 रुपये इतके आहे. या रकमेतून कर देखील कट केला जाणार आहे. या स्पर्धेत एनपीसीआय पेमेंट सिक्युरिटीसह इतर चार पॅरामीटर्सच्या आधारे विजेत्याची निवड केली जाईल. अर्ज करण्यासाठी आपण या URL वर क्लिक करा – https://grand-challenge.ciie.co/

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/