छत्रपती शिवाजी महाराजांवर ‘बायोपिक’ ! रितेश देशमुख साकारणार ‘ही’ भूमिका, ‘सिंघम’ अजयनं केला मोठा ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणचा आगामी बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘तानाजी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या अजय आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अजय देवगणने आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी एक खुलासा केला की अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांवर बायोपिक बनवत आहे त्याचबरोबर चित्रपटाच्या कामाला सुरुवात देखील झाली.

एका मुलाखतीमध्ये अजय देवगणला विचारण्यात आले की, शिवाजी महाराजाच्या बायोपिकमध्ये भूमिकेत कोणाला पाहायला आवडेल. या प्रश्नाचे उत्तर देताना अजयने एका सेकंदातच रितेश देशमुखचे नाव घेतले. अजय म्हणाला की, ‘मी रितेशचे नाव या कारणामुळे घेतले कारण त्याने आधीपासूनच शिवाजी महाराजांच्या बायोपिकवर काम करण्यास सुरुवात केली आहे.’

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. निष्ठावान मावळ्यांनी त्यांना भक्कम साथ दिली. याच मावळ्यांपैकी सुभेदार तानाजी मालुसरे. आपल्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून शिवरायांच्या एका शब्दाखातर युद्धातासाठी सज्ज झालेल्या तानाजींच्या रुपात मराठ्यांचा इतिहास या चित्रपटातून उलगडणार आहे. अजय देवगण या चित्रपटात तानाजी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचबरोबर काजोल तानाजी यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मराठमोळा अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 10 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/