फायद्याची गोष्ट ! ‘या’ सरकारी स्कीमध्ये दररोज फक्त 7 रूपये जमा करून मिळवू शकता 5000 रूपये मासिक पेन्शन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अटल पेन्शन योजना (एपीवाय) देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना 60 वर्षांच्या वयानंतर प्रत्येक महिन्याला 1,000 रुपयांपासून 5,000 रुपयांपर्यंत ठरलेली मासिक पेन्शन देणारी ही योजना आहे. ही पेन्शन योजना जून, 2015 मध्ये राष्ट्रीय स्तरावर लागू करण्यात आली होती. ही योजना स्वावलंबन योजना एनपीएस लाइटच्या ठिकाणी लागू करण्यात आली होती. अटल पेन्शन योजनेचे संचालन पेन्शन फंड रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी (पीएफआरडीए) द्वार करण्यात येते. ती दशभरात सर्व बँकांद्वारे लागू केली जाते. जर तुम्हाला सुद्धा महिन्यात 210 रुपये वाचवून 5,000 रुपयांची मासिक पेन्शन मिळवायची असेल तर या योजनेत सहभागी व्हा. या योजनेची नियम जाणू घ्या…

एपीवायसाठी एलिजिबिलिटी

भारतातील 18 ते 40 वर्षांच्या वयोगटातील कोणीही व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकतो. जर तुमचे कोणत्याही बँकेत किंवा पोस्टात खाते असेल तर तुम्ही योजनेत सहभागी होऊ शकता.

पेन्शन मिळवण्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक

पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला किती रक्कम भरावी लागेल हे दोन गोष्टींवर अवलंबून असते. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या वयात या योजनेत सहभागी होत आहात. दुसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला वयाच्या 60 वर्षाच्या वयानंतर किती पेन्शन हवी.

उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती 18 व्या वर्षी या योजनेत सहभागी होत असेल आणि वयाच्या 60 व्या वर्षानंतर 1,000 रुपये मासिक पेन्शन पाहिजे असेत तर त्यास 60 वर्षाच्या वयापर्यंत प्रत्येक महिन्याला 42 रुपये खर्च करावे लागतील. जर, या व्यक्तीला 5,000 रुपये मासिक पेन्शन हवी असेल तर त्यास 60 वर्षांचा होईपर्यंत प्रति महिना 210 रुपये जमा करावे लागतील. या स्कीम अंतर्गत 1,000 रुपये, 2,000 रुपये, 3,000 रुपये, 4,000 रुपये आणि 5,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळते.

एपीवाय अंतर्गत आयकरवर मिळतो लाभ

या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला एनपीएसप्रमाणे समान कर सवलत मिळते. आयकर कायदा, कलम 80 सीसीडी (1बी) अंतर्गत या योजनेत करात सवलत मिळते.

एक्झिट करण्याचा काय आहे पर्याय?

सबस्क्रायबर्सला 60 वर्षाच्या वयाच्या अगोदर या योजनेमधून एक्झिट करण्याचा पर्याय केवळ असाधारण स्थितीत मिळतो. उदाहरणार्थ जर व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या स्पाउसला मासिक पेन्शन दिली जाते. स्पाउसचा मृत्यू झाल्यास सबस्क्रायबरच्या नॉमिनीला एकरकमी पैसे दिले जातात. तर, सबस्क्रायबरच्या मृत्यूच्या स्थितीत स्पाउसची इच्छा असल्यास तो योजनेत गुंतवणूक सुरू ठेवू शकतो.