पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सऊदी अरामको येथे झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आज तुम्हाला नव्या दरांप्रमाणे इंधन भरावे लागेल. जाणून घेऊयात आज नक्की पेट्रोल डिझेलचा काय दर आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल 6 पैशानी वाढून 74.19 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 7 पैशांनी वाढून 67.14 रुपये प्रति लीटर इतके झाले आहे.  कोलकत्त्यामध्ये, आज पेट्रोल 6 पैशांनी वाढून 76.88 रुपये प्रति लीटर आणि डीझेल 7 पैशांनी वाढून 69.56 रुपये प्रति लीटरवर पोहचले आहे.

मुंबईमध्ये सुद्धा 6 पैशांनी वाढ झाली आहे, त्यामुळे सध्या पेट्रोल 79.85 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 7 पैशांच्या तेजीसह 70.44 रुपये प्रति लीटर झाले आहे.  चेन्नईमध्ये पेट्रोल 6 पैशानी वाढून 77.12 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 7 पैशानी वाढून सध्याचा दर 70.98 रुपये प्रति लीटर इतका आहे.

दिल्ली नोएडामध्ये आज पेट्रोल 5 पैशानी वाढून 75.66 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 7 पैशांनी वाढून 67.46 रुपये प्रति लीटरवर पोहचले आहे. तसेच गुरुग्राम मध्ये आज पेट्रोल 5 पैशांनी वाढून 73.86 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 6 पैशांनी वाढून 66.29 रुपये प्रति लीटर इतके झाले आहे.

Visit : policenama.com