खळबळजनक ! भर चौकात भाजपा कार्यकर्त्याचा सपासप वार करून खून

लातूर : पोलीसनामा ऑनालाइन – आम्ही सत्तेवर असताना माहिती अधिकारात माहिती मागवून त्रास देत असल्याच्या रागातून एका भाजपा कार्यकर्त्याचा सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना लातूर जिल्ह्यातील शिरोळ वांजरवाडा येथे आज (सोमवार) घडली आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

राजेंद्र जाधव असे खून करण्यात आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांचे नाव आहे. तर याच गावचे सरपंच विश्वास जाधव आणि त्यांचा पुतण्या सुरेश जाधव या दोघांनी भर चौकात राजेंद्र यांच्यावर चाकूनं वार करून खून केला. राजेंद्र जाधव यांनी माहिती अधिकारातून माहिती काढल्याचा राग दोघांच्या मनात होता. त्यातूनच त्यांनी राजेंद्र यांचा खून केला.

राजेंद्र जाधव हे आज सकाळी गावातील बस स्थानकासमोर चहा पीत होते. त्यावेळी अचानक सुरेश जाधव याने राजेंद्र यांच्यावर सपासप वार केले. वर्मी वार लागल्याने काही वेळातच राजेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पुढील तपास निलंगा पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like