भाजपाचा 3 तर शिवसेनेचा 2 वर्ष ‘मुख्यमंत्री’, NDA तील ‘या’ केंद्रीय मंत्र्यानं सांगितला नवा ‘फॉर्म्युला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्तास्थापनेला वळण मिळताना दिसत आहे. एकीकडे राज्यात महाशिवआघाडी सत्तास्थानेकडे कूच करत असताना आता भाजपचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. जो शिवसेना आणि भाजपच्या सत्तास्थापनेसंबंधित आहे. भाजपकडून शिवसेनेला मुख्यमंत्रिपद दिले जाऊ शकते असे केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

एकीकडे शिवसेनेने एनडीएतून काडीमोड घेतला असे खुद्द शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे परंतू राज्यातील युतीवर अजून कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. त्यामुळे नवा फॉर्म्युला घेऊन भाजप शिवसेना सत्तास्थापनेसाठी पुन्हा एकत्र येऊ शकतात का याबाबात संभ्रम आहे.

रामदास आठवले यावर म्हणाले की मी संजय राऊतांशी चर्चा केली. त्यांनी वाटाघाटी कराव्यात. मी त्यांना मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला सांगितली, त्यात भाजपला 3 वर्ष मुख्यमंत्रिपद आणि 2 वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रिपद असे असेल. हा फॉर्म्युला भाजपने मान्य केला तर शिवसेनेने यावर विचार करावा. मी याबाबत भाजपशी देखील चर्च करणार आहे.

रामदास आठवलेंच्या या वक्तव्यमुळे दूरावलेली भाजप शिवसेना पुन्हा एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत का यावर सशंकता आहे. मुळातच शिवसेना भाजप यांच्यातील वाद मुख्यमंत्रिपदावरुन आहे. परंतू आठवले यांच्या वक्यव्यनुसार भाजप शिवसेना मुख्यमंत्रिपदाचे वाटप करुन एकत्र येणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

एकीकडे राज्यात सत्तास्थानपनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रयत्न करताना दिसत आहे तर दुसरीकडे भाजप शिवसेनेचे सत्तास्थापनेची चर्चा अजूनही सुरु आहे असे संकेत आठवले देत आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे.

Visit : Policenama.com