मुलगा सोडला तर अजित पवारांना कोणाचेच कौतुक नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांना आपल्या मुलाचे कौतुक सोडले तर त्यांना इतर कोणाचेही कौतुक नसल्याचा टोला खासदार गिरीश बापट यांनी लगावला आहे. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी युतीचा निर्णय पक्ष श्रेष्ठी घेणार असल्याने यावर बोलणे टाळले.

अजित पवारांवर निशाणा साधताना खासदार बापट म्हणाले, विरोधक वैतागले असून अजित पवार अधिकच वैतागले आहेत. सत्तेत राहण्याची सवय असणाऱ्या अजित पवारांना आता सत्तेबाहेर रहावे लागत आहे. तसेच त्यांना आदर्श विरोधी पक्ष म्हणू काम करता येत नाही. काम कसं करायचं ते त्यांनी आमच्याकडून शिकावं असं म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे उमेदवार मागीलवेळी पेक्षा अधिक मतांनी विजयी होती. जिल्ह्यात 2014 पेक्षा भाजप आमदारांची संख्या वाढलेली असेल, पुणे जिल्ह्यात भाजपची घौडदौड वाढेल असा विश्वास खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला. तसेच पुण्याची जबाबदारी आपल्याकडे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील मंत्र्यांच्या सभा होणार असल्याचे सांगितले.

Visit : policenama.com