देवेंद्र फडणवीसांचा घणाघात, म्हणाले – ‘बाळासाहेब ठाकरे यांचा ‘सामना’ आता शिल्लक राहिला नाही’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा सामना आता शिल्लक राहिला नाही. आता प्रसिद्ध होणाऱ्या सामनाला बेस नाही. आताचे अग्रलेख कसे छापले जातात हे सगळ्यांना माहित आहे, सामना छापतो.. देव पळून गेले आणि उद्धव ठाकरे विठ्ठलाला साकडं घालतात, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस हे बुधवारी (दि.8) उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी भाजपचे नेते गिरिश महाजन, प्रवीण दरेकर, विभागीय आयुक्त, पोलीस महानिरीक्षक, आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, अधीक्षक उपस्थित होते.

बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर घणाघाती टीका केली. केंद्र सरकारने राज्य सरकारला भरीव मदत दिली. याची पुस्तिका छापली. राज्याच्या एकही मंत्री ते खोडू शकला नाही. राज्यातील सरकार अंतरविरोधानं पडेल, असं भाकित देखील देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवलं आहे.
पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे
– सर्व हॉटस्पॉटवर तातडीने तपासणी केली पाहिजे
– मुंबईत पॉझिटिव्ह रुग्ण आकडा दिशाभूल करणारा
– मुंबईत परिस्थिती अत्यंत भीषण
– मास्क टेस्टिंग सुरु करणे आवश्यक
– राज्य सरकारने महापालिकांना मदत केली पाहिजे
– अधिकाऱ्यांच्या बदल्यात गडबड म्हणजे कुरघोडी आणि संवाद हीनता
– पवार साहेबांना मध्यस्थी करावी लागते हे दुर्दैंवी