एकास 3 हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण, करून दाखवा, रडू नको, पत्रकार परिषदेनंतर BJP च्या आशिष शेलारांचे सलग 8 ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने काल राज्य सरकारला केंद्रान कशी मदत केली याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी महाविकास आघडीने आज तिनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत फडणवीस यांनी केलेला प्रत्येक आरोप खोडून काढला. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी लागोपाठ 8 ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केला.

विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राला काय मिळेल आणि कसे मिळेल हे सांगितले. त्यावर एवढी का कळ पोटात गेली. एका माणसाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आघडीची तीन माणसं धावली. घाबरताय कशाला ? तुमचं अपयश, नाकर्तेपणा उघड होतो त्याला ? एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण ! करुन दाखवा, रडू नको, अशी टीका आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची आकडेवारी आभासी असून गोंधळ निर्माण करुन महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भजपचा प्रयत्न आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. यावर भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर लागोपाठ 8 ट्विट करत महाविकास आघाडीतील नेत्यांच्या समाचार घेतला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like