‘सागरा प्राण तळमळला, या देशात तरुणांना काय हवंय’, पंकजा मुंडेंचा राहुल गांधीवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भाजपने हा विषय जोरदार लावून धरला आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका होत असतानाच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करून राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

आपल्या ट्विट मध्ये पंकजा मुंडे म्हणतात, सागरा प्राण तळमळला या देशात तरुणांना काय हवंय… 1947 पूर्वी स्वातंत्र्य हवं होतं, आता स्थैर्य हवं आहे. महात्म्यांचा अपमान त्यांचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केल्याने होचोच.. प्रचंड संतापही होतो.. त्यांच्या नावाच्या राजकारणाने पीडा ही होते… कधी आपण संवेदनशील होऊन देशाच्या पुढील पिढीसाठी योगदान देणार ???… जसे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले, असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होताच सभागृहात मोठा गदारोळ झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आहे, असा आरोप करत भाजपने सरकारविधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, विरोधकांच्या गदारोळातही सरकारकडून कामकाज सुरु ठेवण्यात आले होते. आज भाजपने सावरकरांचा मुद्दा जोरदार लावून धरला होता. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणीही भाजपने केली.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/