भाजपच्या नव्या कार्यकारिणीवर पंकजा मुंडेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  भाजपने आज महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत माझ्यासोबत 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रटरी, 6 जनरल सेक्रटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहेत अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मात्र, भाजपच्या कार्यकारिणीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा डावलण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांना भाजप कार्यकारणीत महत्त्वाची भूमिका देतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीत पंकजा मुंडे यांना स्थान न दिल्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. परंतु पंकजा मुंडे यांना केंद्राच्या कार्यकारिणीत जबाबदारी देण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

भाजपची आज नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, नवीन भाजपच्या टीमचे अभिनंदन, तसेच माझ्या विषयीची भूमिका जाहीर केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचे आभार.

दरम्यान, पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळालं नसलं तरी त्यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल. तसेच भाजपच्या नेत्या प्रीतम मुंडे भाजपच्या नेत्या रक्षा खडसे या दोनवेळा खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नाराजीमुळे जबाबदारी दिली, असं नाही, अशी माहिती देखील चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

सरचिटणीस – सुरजीतसिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय
उपाध्यक्ष – राम शिंदे, चित्रा वाघ, कपील पाटील, प्रसाद लाड, माधव भंडारी, सुरेश हळवणकर, प्रीतम मुंडे
मुख्य प्रतोद – आशीष शेलार, प्रतोद माधुरी मिसाळ, महिला मोर्चा – उमा खापरे, युवा मोर्चा – विक्रांत पाटील
तर एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना फक्त विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आलं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like