पंकजा मुंडेंची पक्षावरुन नाराजी उफळून यायला ‘हीच’ आहेत का ती 3 ‘कारणं’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या म्हणून पंकजा मुंडेचीं ओळख. भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीत राजकारणात पदार्पण केल्यानंतर पंकजा मुंडेंनी 2009 साली विधानसभा निवडणूकीत परळी मतदार संघातून विजय मिळवला. त्यानंतर गोपीनाथ मुंडेंचा वारस म्हणून लोकांमध्ये पंकजा मुंडे पुढे आल्या. परंतू आता या ओबीसी नेत्या पंकजा मुंडे पक्षातील नाराजीमुळे चर्चेत आल्या आहेत.

2014 च्या लोकसभा निवडणूकीनंतर लोकसभा निवडणूकीनंतर गोपीनाथ मुंडे याचे अपघातात निधन झाले. त्यानंतर मुंडे घराची वारस म्हणून राजकारणात सक्रिय होत पंकजा मुंडे यांनी त्यानंतर पार पडलेल्या विधानसभेत धनंजय मुंडेंचा 26 हजार मतांनी पराभव केला. त्यांच्याकडे फडणवीस सरकारमध्ये महिला बाल कल्याण मंत्री, ग्रामविकास मंत्री, जलसंधारण अशा खात्यांची जबाबदारी देण्यात आली.

पंकजा मुंडे मंत्री म्हणून काम करत असताना दसरा मेळाव्यावरुन बीडमधील वातावरण ढळवून निघाले. पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्यानंतर सावरगाव येथे भगवान भक्ती गड स्थापन करुन नवी परंपरा सुरु केली. तिथे त्यांनी ओबीसी, वंजारा, ऊसतोड मजूर यांना एकत्र आणून पंकजा मुंडेंनी शक्तीप्रदर्शन केले. पंकजा मुंडेचा यानंतर राज्यातील अनेक मतदार संघात प्रभाव निर्माण झाला. साखर कारखानदार आणि ऊसतोड मजूर लवादाच्या देखील प्रमुख आहे.

परंतू यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेचा पराभव केला. त्यानंतर परळीत झालेल्या पंकजा मुंडेंच्या पराभवावर तर्कवतर्क लढवण्यात आले. पंकजा मुंडेचा पराभव घडवून आणण्यात आला अशी ही चर्चा सुरु झाली.

मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि पंकजा मुंडे यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी त्यांचा मोठा पराभव केला. परळी मतदारसंघात झालेल्या पंकजा मुंडे यांच्या पराभवाबद्दल राज्यभरात तर्क-वितर्क लढवले गेले. भाजप नेतृत्वानेच पंकजा मुंडेंचा पराभव घडवून आणला, असंही बोललं जात आहे. तसंच आता पंकजा मुंडे यांनी भाजपच्या महत्त्वाच्या बैठकींना जाणं टाळलं. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे नेमक्या कोणत्या कारणामुळे भाजपमध्ये नाराज झाल्या, याची चर्चा होत आहे.

मनातल्या मुख्यमंत्री
2014 साली लोकसभेपाठोपाठ भाजपला राज्यात विधानसभा निवडणूक देखील मोठे यश मिळाले. तेव्हा मुख्यमंत्रिपदासाठी अनेकांची नावे आघाडीवर होती. एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांचा यात समावेश होता. परंतू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस याचे नाव पुढे आले. परंतू पंकजा मुंडेची महत्वकांक्षा लपून राहिली नाही. मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे असे वक्तव्य पंकजा मुंडेंनी केले. परंतू वडीलांनी पक्षासाठी केलेली कामानंतर देखील मुख्यमंत्री पद आपल्याला न मिळाल्याची भावना त्यांच्या मनात होती का असा प्रश्न उपस्थित झाला.

देवेंद्र फडणवीस 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री
युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीपणे राज्याचा कारभार राबवला. पहिल्यापासून 5 ही वर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे चित्र होते ते कायम राहिले. या दरम्यान शेतकऱ्यांची आंदोलने, मराठा, धनगर हा आरक्षणाचा प्रश्न, भीमा कोरेगाव प्रकरण यासारख्या अनेक प्रश्नावर फडणवीसांनी योग्य मार्ग काढला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व भाजपात प्रबळ झाले. एकनाथ खडसेंना देखील मंत्रिमंडळातून बाहेर बसावे लागले. पंकजा मुंडे देखील काहीशा दूर होत गेल्या. राज्यातील भाजपचा चेहरा बनण्यास देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले.

विधानसभेत अपयश
परळी विधानसभेने पहिल्यापासून राज्याचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. प्रचारात धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्या हायवोल्टेज ड्रामा देखील रंगला. दोघांसाठी ही लढत अत्यंत महत्वाची होती. परंतू बाजी मारण्यात धनंजय मुंडे यशस्वी ठरले. हा पराभव पंकजा मुंडेच्या जिव्हारी लागल्याचे बोलले गेले.

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी एक फेसबूक पोस्ट लिहित कार्यकर्त्यांना 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावर उपस्थित राहण्याचा आवाहन केले. असे सांगण्यात येत आहे की यावेळी पंकजा मुंडे पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करु शकतात.

फेसबुक पेज ला लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like