नागपुरात जल्लोषाच्या नादात फिजकल डिस्टन्सिंगचा फज्जा, भाजप आमदार, खासदारासह 70 जणांवर गुन्हे दाखल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या ( coarana) पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत गर्दी जमवून बिहार विधानसभा निवडणुक यशाचा जल्लोष साजरा करणा-या भाजप आमदार, खासदारासह 60 ते 70 जणांवर गणेशपेठ पोलिसात गुन्हे दाखल (bjp-mp-mla-charges-filed-against-activists) करण्यात आले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा ( physical distancing)फज्जा उडाला होता.

बिहार विधानसभा निवडणुकीत( Bihar Election) रालोआला ( NDA) मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे बुधवारी सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान गणेशपेठेमध्ये जल्लोष करण्यात आला. या कार्यक्रमाची पूर्वपरवानगी पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडून घेतली नाही. गर्दी जमविण्यास मनाई असतानाही मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. याची दखल घेऊन गणेशपेठ पोलिसांनी खासदार विकास महात्मे, भाजप शहराध्यक्ष व आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे यांच्यासह 60 ते 70 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.