राष्ट्रवादीला राज्यासह केंद्रातही मंत्रिपदांची ‘सुवर्ण’संधी, PM मोदींच्या ‘कौतुका’नंतर चर्चेला ‘उधाण’

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का अशी चर्चा सध्या सुरु आहे.

शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप सध्या राष्ट्रवादीला जवळ करताना दिसत आहे त्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा सस्पेन्स अजूनच वाढत चालला आहे. राष्ट्रवादी थेट भाजपसोबत सहभागी झाली नाही तरी ठरावावेळी अनुपस्थित राहून भाजपला मदत करू शकते. भाजपचे 105 तर राष्ट्रवादीचे 54 आमदार आहेत. त्यांचे संख्याबळ 159 होते, शिवाय भाजपला लहान पक्ष व अपक्ष अशा 14 आमदारांचा पाठिंबा पाहता, संख्याबळ 173 होते.

विश्वासदर्शन ठरावावेळी राष्ट्रवादी अनुपस्थित राहिली तर
राष्ट्रवादीचे 54 सदस्य अनुपस्थित राहिल्यास सभागृहात 234 सदस्य उरतात. अशा वेळी बहुमतासाठी भाजपला 117 आमदारांची गरज असेल आणि भाजपकडे 119 आमदार आहेत. त्यामुळे सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकू शकेल. अशा प्रकारे राष्ट्रवादीने गेल्या वर्षी भाजपला मदत केली होती.

Visit : Policenama.com 

 

Loading...
You might also like