‘आता चमचेही कमी पडू लागले का ?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या दिलखुलास व्यक्तिमत्वासाठी ओळखले जातात. विविध प्रकारचे किस्से ते नेहमी सांगत असतात. अशाचप्रकारचा आणखी एक किस्सा त्यांनी पुण्यामधील कार्यक्रमात सांगितला. भारतात आता चमचेही कमी पडू लागले आहेत का? असे म्हणत त्यांनी यासंबंधी एक किस्सा उपस्थितांना ऐकवला.

यावेळी त्यांनी सांगितले कि, देशभरातील उदयॊग व्यवसायांसंबंधी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये चीनमधून प्लास्टिकचे चमचे देखील आपल्या देशात आयात केले जातात,अशी माहिती मला मिळाली. त्यावरून मी सेक्रेटरीला म्हटलं कि, अपने हिंदुस्थान में चमचो की भी कमी पड गई क्या?, त्यांनी हा किस्सा ऐकवल्यानंतर सभागृहात मोठा हशा पिकला. यावेळी पुढे बोलताना त्यांनी म्हटले कि, विविध प्रकारचे उपक्रम आपल्या देशात हाती घेण्यात आले असून बांबूपासून तेल मिळत असल्यामुळे त्याच्या शेतीला प्राधान्य द्यायला हवे, असेदेखील त्यांनी म्हटले. दिल्ली-मुंबई हायवेचे काम लवकरच पूर्ण होणार असून यामुळे खूप वेळ वाचणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर आणखी काही महामार्गांचे काम देखील सुरु असून ते लवकरच पूर्ण होणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

दरम्यान, भारतात मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत असून या सर्व शहरांमध्ये विकासकामे सुरु असल्याचे देखील गडकरी यांनी सांगितले. त्याचबरोबर उद्योग आणि व्यवसाय याचे देखील केंद्रीकरण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Visit : Policenama.com