भाजपाची पुन्हा एकदा नवी खेळी ! सेनेला डावलून सत्तास्थापनेची तयारी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नसून शिवसेना आणि भाजप एकमेकांवर दबाव निर्माण करून सत्तेत मोठा वाटा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा घेण्याची धमकी देत असतानाच मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर आम्ही इतर पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करू शकत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने शपथविधीची तयारी सुरु केली असून 5 किंवा 6 नोव्हेंबरला भाजप शपथविधी सोहळा घेणार आहेत. मात्र शिवसेनेने आपली भूमिका सोडली नसून ते सत्तेमध्ये समान वाटा या आपल्या मागणीवर ठाम आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील आतापर्यंत शिवसेनेची बाजू भक्कमपणाने मांडली असून शिवसेना दबावतंत्राचा उत्तम वापर करून जास्तीतजास्त मंत्रीपदे मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

मात्र दुसरीकडे भाजपने शिवसेनेला सोबत न घेता 2014 प्रमाणे शपथविधीचा तयारी केली असून मुख्यमंत्री फडणवीस आणि काही मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे वरिष्ठानी दिलेल्या आदेशानुसार भाजप कामाला लागली असून शिवसेनेची वाट न पाहता स्वबळावर सत्ता स्थापन करा असे आदेश भाजपला मिळाले आहेत. तसेच काल सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती राजवटीची भीती व्यक्त करत शिवसेनेला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांच्या या भीतीला न घाबरता शिवसेना त्यांच्या मागणीवर ठाम असल्याने भाजपपुढील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

दरम्यान, भाजपने आपल्या सर्व 105 आमदारांना मुंबईमध्ये तळ ठोकण्यास सांगितले असून 2014प्रमाणे लवकरात लवकर शपथविधी उरकून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे आणखी काही काळ निर्णय लांबवल्यास त्याला फाटे फुटण्याची शक्यता असल्याने भाजपने यामध्ये घाई केली आहे. त्यामुळे भाजपने 5 तारखेला शपथविधी कार्यक्रम घेण्याची तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Visit : Policenama.com 

हळद आरोग्यासाठी चांगली, परंतु, योग्य वापर करा, होऊ शकतो दुष्परिणाम
बॉडी बनविण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !
 जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
 ‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार