राष्ट्रवादीमध्ये 2 नेते, 2 निशाण अशी परिस्थिती असल्याने अजित पवारांचा राजीनामा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतात हिंदुत्ववादी दहशतवाद्यांचे अड्डे असल्याबद्दल माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या विधानाचा काल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान युनो च्या बैठकीत उल्लेख केला. शिंदे यांच्या वक्तव्यामुळे देशाची प्रतिमा मालिन झाली आहे. शिंदे आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी याबद्दल माफी मागावी, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण जी माहिती मिळाली त्यामध्ये त्यांच्या पक्षात दोन नेते दोन निशाण अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच राजीनामा दिला असावा असे दिसते, अशी तिरकस टिप्पणी पात्रा यांनी यावेळी केली.

भाजपच्या वतीने कलम 370 वर देशभरात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी पुण्यात आलेल्या पात्रा यांनी भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी केली. याप्रसंगी खासदार गिरीश बापट, संजय काकडे, या अभियानाचे समन्वयक राजेश पांडे उपस्थित होते.

पाक PM इम्रान खानकडून माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदेंच्या ‘त्या’ विधानाचा UN मध्ये वापर

संबीत पात्रा म्हणाले, संपूर्ण जगभरात नरेंद्र मोदी यांनी देशाची छबी अधिक मजबूत केली आहे. तर दुसरीकडे जगभरात पाकिस्तान आतंकवादी देश म्हणून समोर आला आहे. काल युनो मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत हिंदुत्ववादी दहशतवाद्यांचा अड्डा असल्याबाबत तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जयपूर मधील जाहीर कार्यक्रमातील वक्तव्याचा दाखला दिला. त्यावेळी व्यासपीठावर मनमोहनसिंग आणि सोनिया गांधी यादेखील उपस्थित होत्या. त्यांच्या विधानामुळे फार काही फरक पडला नसला तरी देशाची बदनामी झाली आहे. त्या विधानासाठी सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेस च्या नेत्यांनी माफी मागावी. तसेच शरद पवार यांनीही कलम 370 हटवण्याचा बाजूने मतदान केले नाही, याचे स्पष्टीकरणही पवार यांनी करावे, अशी मागणी पात्रा यांनी यावेळी केली.

कलम 370 हटविल्याने 70 वर्षाचा प्रश्न निकाली निघाला आहे. हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळेच शक्य झाले. आगामी काळात जम्मू काश्मीरचा विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील अनेक वर्षात 3 परिवारानी काश्मीरचे वाटोळे केले आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

नोटबंदीमुळे आतंकवाद आणि नक्षलवाद घटला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटबंदीमुळे देशातील नक्षलवाद घटला. पाकिस्तानातून आतंकवाद्यांना मिळणारी रसद बंद झाल्याने आतांकवादी कारवाया घटल्या, असा दावा संदीप पात्रा यांनी यावेळी केला. मात्र नोटबंदीमुळे देशभरात मंदीचे सावट निर्माण झाले याबद्दल बोलणे मात्र त्यांनी टाळले.

Visit : Policenama.com