भाजपाचा राज्यात ‘कर्नाटक पॅटर्न’ ! संजय राऊतांचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – युती करताना ठरलं त्याप्रमाणे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ठाम असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले. तसेच भाजपा महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न राबविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

राज्यात लवकरात लवकर स्थिर सरकार यावे, अशी शिवसेनेची इच्छा आहे. युती करताना जे ठरल होते. त्याप्रमाणे भाजपाने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत तयार असाल तरच बोला, हीच शिवसेनेची भूमिका असल्याचे राऊत यांनी सांगितले.

भाजपाने राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव आखला असल्याचे सांगून भाजपाने आपण सरकार स्थापन करु शकत नाही, असे जाहीर करावे. नितीन गडकरी यांच्याकडे शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याविषयी पत्र असले तर ते मातोश्रीवर जाऊ शकतात, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
शिवसेनेच्या आमदारांवर कोणी दबाव आणू नये, म्हणून सर्व आमदारांना रंगशारदा येथे एकत्र ठेवण्यात आले आहे.

भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज होणार आहे. महाराष्ट्राचे प्रभारी भुपेद्र यादव तसेच परिवहन मंत्री नितीन गडकरी हे आज मुंबईत येणार आहेत. दिल्लीत काल रात्री भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भुपेंद्र यादव यांच्याबरोबर चर्चा झाली. यादव हे शहा यांचा निरोप घेऊन मुंबईला येत असून कोअर कमिटीत ते हा निरोप सांगण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गडकरी हे शिवसेनेशी संपर्क साधूत असून त्यातून काही तोडगा निघतो का याची चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळे भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, यावर राज्यातील सत्ता स्थापनेबाबतचा तिढा सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like