धुळे जि.प.वर भाजपचा ‘झेंडा’, काँग्रेस-राष्ट्रवादीची ‘पिछेहाट’

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळ्यात जिल्हा परिषदेवर कमळ फुलवण्यात भाजपला यश आले आहे. 56 जागांसाठी पार पडलेल्या निवडणूकीचे पूर्ण निकाल हाती येण्याआधी भाजपने बहुमताचा आकडा गाठला. त्यामुळे राज्यात सत्ता असलेल्या महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे.

धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणूकांचे आज निकाल लागले. या 56 पैकी 31 जागांवर भाजपने मुसंडी मारली त्यामुळे भाजपचा विजय निश्चित मानला गेला. भाजपचे बडे नेते जयकुमार रावल आणि सुभाष भामरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. धुळे जिल्हा परिषदेची निवडणूक या दोन नेत्यांच्या नेतृत्वात लढली गेली.

निकाल हातात येत असतानाच सुरुवातीलाच भाजपने मुसंडी मारली होती. सुरुवातीपासूनच भाजपचे जादूई आकड्याच्या मागे पळत होती. बहुमताचा आकडा हा 29 जागांचा होता आणि भाजपने हा जादूई आकडा निर्विवादपणे गाठला. भाजपसाठी हा मोठा विजय मानला जात आहे. 31 जागांवर निर्विवाद बहुमत मिळवत भाजपने धुळे जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेतली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/