Black Fungus : तोंडातून सुद्धा पसरू शकतो ब्लॅक फंगस, आवश्य घ्या खबरदारी; जाणून घ्या

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रकोप सुरू असतानाच आता ब्लॅक फंगसने सुद्धा धुमाकुळ घातला आहे. म्यूकरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगस देशाच्या विविध भागात वेगाने पसरत आहे. ब्लॅक फंगसचा वेळेवर उपचार केला नाही तर तो घातक ठरू शकतो.

इम्यून सिस्टम
एक्सपर्टनुसार, हा आजार त्या लोकांमध्ये पसरतो ज्यांची इम्युन सिस्टम कमजोर आहे. ज्यांना अगोदर कोणता ना कोणता आजार आहे. याशिवाय कोविडची औषधे डायबिटिक आणि नॉन डायबिटिक दोन्ही रूग्णांची शुगर लेव्हल वाढवू शकतात, ज्यामुळे ब्लॅक फंगस वाढू शकतो. स्वच्छता राखली तर हा या आजाराचा धोका कमी करता येतो.

डायबिटीज
आरोग्य मंत्रालयानुसार ब्लॅक फंगसचा धोका कोरोनातून बरे होणार्‍या रूग्णांसह इतर लोकांमध्ये सुद्धा दिसत आहे. अनियंत्रित डायबिटीज, स्टेरॉईडमुळे कमजोर इम्यूनिटी, मोठ्या कालावधीपर्यंत आयसीयूमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये राहणे, इतर आजारांशी सामना करत असलेले, वोरिकोनाझोल थेरेपी सारख्या प्रकरणात हा धोका खुप वाढतो.

सडलेले अन्न
एक्सपर्टनुसार, ब्लॅक फंगस सर्व ठिकाणी असू शकतो. जमीन, वातावरण, झाडे आणि सडलेले अन्न आणि एयर कंडीशनरचे ड्रिप पॅन असा कुठूनही ब्लॅक फंगस पसरू शकतो. दूषित हवा किंवा यामध्ये पसरलेले संक्रमित कणांच्या संपर्कात आल्याने कोणत्याही व्यक्तीला फंगल आणि वायरल इन्फेक्शन होऊ शकते. त्वचेवर जखम झाल्याने सुद्धा ब्लॅक फंगस पसरू शकतो.

ही आहेत लक्षणे
ब्लॅक फंगसच्या प्रमुख लक्षणांमध्ये जीभेचा रंग बदलणे, हिरड्यांमध्ये सूज, डोळ्यांमध्ये लालसरपणा किंवा वेदना, हिरड्यांमध्ये वेदना, ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, जास्त वेदना, उलटीत रक्त, बंद नाक किंवा चेहर्‍यावर सूज इत्यादी लक्षणांचा समावेश आहे.

अनेकदा ब्रश करा
कोविडमधून बरे झाल्यानंतर, स्टेरॉईड आणि इतर औषधांचे सेवन तोंडात बॅक्टेरिया किंवा फंगस वाढवण्यास मदत करतात आणि सायनस, फुफ्फुसे आणि अगदी मेंदूत सुद्धा समस्या निर्माण करते. दिवसात दोन-तीन वेळा ब्रश करा. तोंडाची स्वच्छ करण्याने खुप मदत मिळू शकते.

टूथब्रश बदला
रूग्णांसाठी आजाराच्या प्रभावातून स्वतःला वाचवण्यासाठी कोरोना व्हायरसमधून बरे झाल्यानंतर चांगली मौखिक स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. रूग्णांना सल्ला दिला जातो की, त्यांनी एकदा नकारात्मक परीक्षण केल्यानंतर आपला टूथब्रश बदलावा आणि नियमित तोंड धुवत रहा.

कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांनी आपला ब्रश तिथे ठेवू नये जिथे घरातील अन्य लोक ठेवतात. याशिवाय ब्रश आणि टंग क्लीनर नियमितपणे अँटीसेप्टिक माऊथवॉशने स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जात आहे.