मासिक पाळीच्या वेदना दूर करतो ‘हा’ खास चहा

पोलीसनामा ऑनलाइन – व्यायाम केल्यानंतर शरीरामध्ये अनेक वेदना होत असतात. काही लोक तर अनेक दिवसांनंतर सतत वर्कआऊट करतात. त्यामुळे त्यांचे स्नायूंमध्ये प्रचंड वेदना होत असतात. व्यायामानंतर होणाऱ्या वेदनांमुळे लोक व्यायाम करणंच बंद करतात. जर तुम्हा वेदानांपासून सुटका करून घेयची असेल तर तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

व्यायामामुळे शरीरात वेदना होतातच शिवाय अनेक महिलांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या तीव्र वेदनांचा सामना करावा लागतो. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनांमुळे महिला आपलं काम व्यवस्थितपणे करू शकत नाही. या दोन्ही बाबींमध्ये होणाऱ्या वेदनांपासून सुटका करण्यासाठी फायदेशीर ठरणारा रामबाण उपाय म्हणजे मेथीचे दाणे.

मेथीमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवले जाते. साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मिथीचा खूप फायदा होतो. मेथीमध्ये मुबलक प्रमाणात आयर्न आढळून येते. जे महिलांसाठी अत्यंत आवश्यक असते. आज आम्ही तुम्हाला मेथीच्या दाण्यापासून तयार करण्यात येणाऱ्या चहाबाबत सांगणार आहोत. या चहाचे सेवन केल्यास व्यायामानंतर होणाऱ्या वेदना आणि मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना कमी होतील.

तरुणींना आणि महिलांना मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या प्रचंड वेदनांचा सामना करावा लागतो. अशांसाठी मेथीच्या दाण्यापासून तयार केलेला चहा फायदेशीर ठरतो. या चहामुळे तुम्हाला पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत होते.

असा तयार करा मेथीच्या दाण्यापासून चहा
सर्वात आधी एका भांड्यामध्ये 4 ते 5 कप पाणी घेऊन उकळ्यासाठी गॅसवर ठेवा.
पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे किंवा मेथीची पावडर टाका.
भांड्यावर झाकण ठेवून पुन्हा चहा उकळून घ्या.
जेव्हा याचा रंग बदलेल त्यावेळी गॅसवरून उतरुन घ्या आणि थंड होण्यासाठी ठेवा.
मेथीपासून तयार करण्यात आलेला चहा तयार आहे.
तयार चहा मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी किंवा व्यायाम केल्यानंतर होणाऱ्या स्नायूंच्या वेदना कमी होण्यासाठी मदत होते. चवीला हा चहा थोडासा कडवट असला तरी वेदना दूर करण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो.