Abhishek Bachchan ला युजर म्हणाला तुम्ही सिनेमा हॉल उघडल्यानंतर देखील जॉबलेस राहणार, अभिनेत्यानं दिलं जग जिंकण्यासारखं उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   चित्रपट सृष्टीतील बऱ्याच नट नट्या सोशल मीडियावर सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात. त्यामध्ये अभिषेक बच्चन यांना तर युजर्स खूपदा ट्रोल करतात. अभिषेक बच्चन हे त्यांच्या स्वभावाप्रमाणे शांत पध्दतीने उत्तर देतात जे खूपच लक्षणीय असते.

अनलॉक 5 ची घोषणा झाली आणि यामध्ये चित्रपटगृह उघडण्यास सशर्त परवानगी मिळाली. याच अनुषंगाने अभिषेक बच्चन यांनी ही या आठवड्यातील सर्वात आनंदाची बातमी आहे आहे असे ट्विट केले. परंतु लगेच खाली कॅटनीप नावाच्या एका युजर्स ने तरीही तुम्ही बेरोजबागरच असणार असे लिहिले यालाच उत्तर देत अभिषेक बच्चन म्हणाले की हे सर्व तुमच्या हातामध्ये आहे आमचे काम जर आवडले नाही तर आम्ही अजून मेहनतीने काम करू आणि चांगला परिणामाची अपेक्षा करू. त्यावर पुन्हा एका युजर्स ने बच्चन यांना विचारले की तुम्हाला द्रोणा च्या नंतर चित्रपट कस काय भेटला तेंव्हा बच्चन म्हणाले की, तो मला नाही मिळाला याउलट मला काही चित्रपटामधून काढून टाकण्यात आले परंतु त्याच जिद्दीने आणि मेहनतीने मी पुन्हा काम केले पुन्हा संघर्ष केला त्याचे फळ म्हणून मला नंतर चित्रपट मिळाले. अभिषेक च्या या उत्तरांवरून त्याची खूप प्रशंसा होत आहे. अभिषेक च्या याच प्रतिक्रियेवर दिव्या दत्ता हिनेही त्याचे कौतुक केले आहे.