शबाना आझमींचा मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस-वे’वर भीषण अपघात, अभिनेत्री गंभीर जखमी (फोटो)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातात शबाना आझमी जखमी झाल्याचे वृत्त आहे. एका पार्टीला जाताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्टीला अनेक प्रसिद्ध कलाकार जमणार होते. याच पार्टीला शबाना आझमी चालल्या होत्या. यादरम्यान पिंपरी खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाला.

Shabana Azmi

शबाना आझमी चारचाकीने चालल्या होत्या, यावेळी त्यांचे वाहन एका माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला धडकले. या अपघातानंतर घटनास्थळावरील उपस्थितांनी शबाना आझमी यांना वाहनाच्या बाहेर काढले. यावेळी त्या जखमी असल्याचे लक्षात आले. शबाना आझमी ज्या वाहनातून प्रवास करत होत्या त्या वाहनाचे देखील नुकसान झाले आहे.

Car

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/