अनुष्का शर्माच्या फोटोसोबत छेडछाड; सिंदूरवरून सोशलवर वाद ! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या तिच्या प्रेग्नंसीमुळं चर्चेत आहे. अनुष्का आणि तिचा पती व टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) दोघंही बाळाची आतुरतेनं वाट पाहात आहेत. अनुष्कानं 2021 मध्ये म्हणजेच नवीन वर्षात त्यांच्या घरी बाळाचं आगमन होणार असल्याची गुड न्यूज दिली होती. अनुष्काचे बेबी बंपमधील फोटोही अनेकदा समोर आले आहेत. यावेळी तिच्या फोटो सोबत छेडछाड झाली आहे. सध्या हा फोटो सोशलवर खूप चर्चेत आहे.

नेमकं प्रकरण काय ?

सध्या सोशलवर अनुष्काचा एक फोटो खूपच शेअर केला जात आहे. यात ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. फोटोत तिच्या माथ्यावर सिंदूरही दिसत आहे. खास बात अशी की, हा फोटो एडिट केलेला आहे. एडिट करत तिला सिंदूर लावण्यात आला आहे. अशी माहिती आहे की, एका यूट्यूब चॅनेलवर हे करण्यात आलं आहे, ज्यानंतर त्याच्यावर टीका होताना दिसली.

अनुष्कानंदेखील तिच्या इंस्टावरून हा फोटो शेअर केला होता. परंतु यात तिनं सिंदूर लावलेला नव्हता. एका यूट्यूब चॅनेलनं एडिट करत तिच्या फोटोत तिला सिंदूर लावला. यानंतर अनेकांनी त्यावर टीका केली की, सिंदूर लावणं न लावणं ही तिची निवड आहे. त्यामुळं असं काही करणं चुकीचं आहे असं लोकांचं म्हणणं होतं. अनेकांनी ट्विटरवर अनुष्काचा रिअल आणि एडिटेड फोटो शेअर केला आहे.

अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं प्रोड्युस केलेली पाताल लोक ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वीच अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली आहे. या सीरिजचं खूप कौतुक झालं आहे. याशिवाय तिची बुलबुल सीरिजही रिलीज झाली आहे. अ‍ॅक्टिंगबद्दल बोलायचं झालं तर अनुष्का दीर्घकाळापासून सिनेमांपासून दूर आहे. तिचा परी हा सिनेमा रिलीज होऊन 2 वर्षे झाली आहे. ती सुई धागा या सिनेमात वरुण धवनसोबत दिसली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं होतं.

You might also like