Radhe Maa In Bigg Boss 14: सलमान खानच्या शो मध्ये येऊ शकते स्वत:ला ‘देवीचा अवतार’ म्हणवून घेणारी ‘राधे माँ’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कलर्सचा सर्वात वादग्रस्त आणि सर्वात लोकप्रिय शो ‘बिग बॉस 14’ लवकरच सुरू होणार आहे. शो चा प्रोमोही रिलीज झाला आहे. शो चे होस्ट सलमान खाननेही तयारी सुरू केली आहे. वृत्तांनुसार ‘बिग बॉस 14’ मध्ये भाग घेणार्‍या स्पर्धकांची नावेही जवळपास निश्चित झाली आहेत. या नावांमध्ये अनेक टीव्ही कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, अशी बातमी आहे की यावेळी राधे माँ बिग बॉसच्या घरात येऊ शकते.

वृत्तानुसार, राधे माँ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुखविंदर कौरला बिग बॉसच्या निर्मात्यांकडून संपर्क साधण्यात आला आहे. तथापि त्या शो मध्ये येतील की नाही याची घोषणा राधे माँ किंवा त्यांच्या टीमकडून अद्याप झालेली नाही किंवा बिग बॉस टीमने देखील केलेली नाही. स्वत:ला देवीचा अवतार म्हणून वर्णन करणाऱ्या राधे माँ बर्‍याच वादांमध्ये अडकलेल्या आहेत, म्हणूनच कदाचित बिग बॉससाठी त्यांना अ‍ॅप्रोच करण्यात आले आहे.

https://twitter.com/real_khabri_1/status/1300862965621481472?ref_src=twsrc%5Etfw

राधे माँ वर एका व्यक्तीला आपल्या पत्नीविरूद्ध हुंड्यासाठी छळ करण्यासाठी भडकवल्याचा, लोकांशी अश्लील बोलण्याबाबतचा देखील आरोप आहे. एकेकाळी राधे माँ ची भक्त असणारी अभिनेत्री डॉली बिंद्रानेही त्यांच्यावर आरोप केले आहेत. राधे माँ ची सोबत सोडताना डॉली बिंद्रा म्हणाली होती की, ‘2015 मध्ये राधे माँ आणि तिच्या भक्तांनी तिला चंदीगडमधील पंजाब पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निवासस्थानी लैंगिक अत्याचाराचा बळी ठरवले होते.’ या प्रकरणात डॉली बिंद्राने राधे माँ विरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती.

विचित्र मार्गाने लोकांचे दु:ख दूर करणारी आणि भक्तांना लाल गुलाब देऊन ‘आय लव्ह यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट’ म्हणणारी राधे माँ तिच्या पेहरावाबद्दलही खूप चर्चेत राहिली आहे.