सुशांत सिंह राजपूतकडं देशासाठी पहिला ऑस्कर पुरस्कार जिंकण्याची होती क्षमता, ‘या’ अभिनेत्रीनं सांगितलं

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूड स्टार सेलिना जेटली हिनं लग्नानंतर सिनेमात वापसी केली आहे. अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत तिनं सुशांत सिंह राजपूतबद्दल भाष्य केलं आहे. इतरांप्रमाणे सुशांतच्या निधनानं तिलाही जोरदार धक्का बसला होता असं ती सांगते. इतकच नाही तर तो किती टॅलेंटेड अ‍ॅक्टर होता हेही तिनं सांगितलं आहे. विशेष बाब अशी की, तर या मुलाखतीत तिनं इतरही अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. परंतु सुशांत सिंह राजपूतबद्दल ती जे काही बोलली आहे त्यानं लक्ष वेधलं आहे.

‘सुशांतमध्ये भविष्यात भारतासाठी पहिला ऑस्कर जिंकण्याची धमक होती’
सेलिना जेटली म्हणाली, “ही खूप दु:खद बातमी आहे. आपण खूपच टॅलेंटेड अ‍ॅक्टरला गमावलं आहे. कोणतरी आपलं प्रेम गमावलं आहे, कोणीतरी आपला भाऊ गमावला आहे आणि फिल्म इंडस्ट्रीतून एक चमकता तारा निघून गेला आहे. सुशांत एक टॅलेंटेड अ‍ॅक्टर होता ज्याच्यामध्ये भविष्यात भारतासाठी पहिला ऑस्कर जिंकण्याची धमक होती. माहित नाही असं काय झालं होतं की, सुशांतला असं पाऊल टाकावं लागलं.

सेलिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं सीजन्स ग्रीटींग या सिनेमातून लग्नानंतर अ‍ॅक्टींगमध्ये धमाकेदार कमबॅक केलं आहे.