सेलिना जेटलीनं सांगितलं दु:ख, म्हणाली- ‘एक मुलगा NICU मध्ये होता, तर दुसऱ्याच्या अंत्यसंस्कारांची तयारी सुरू होती !’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सेलिना जेटली (Celina Jaitly) हिंन तिच्या जुळ्या मुलांपैकी एकाला गमावलं. ज्याची जखम आजही तिच्या हृदयात ताजी आहे. सेलिनानं वर्ल्ड प्रीमॅच्योर डे (World Prematurity Day) च्या निमित्तानं सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिनं तिच्या त्या मुलाबद्दल सांगितलं आहे ज्याला तिनं गमावलं आहे.

वर्ल्ड प्रीमॅच्योर डे 17 नोव्हेंबर 2011 रोजी सुरू करण्यात आला होता. या निमित्तानं सेलिनानं शेअर केलेल्या इमोशनल पोस्टमध्ये तिनं मुलांसोबतचे कोलाजमधील फोटो शेअर केले आहेत. आपल्या पोस्टमध्ये ती लिहिते की, कोणत्याही मुलासाठी वेळेआधीच त्याचा जन्म होणं ही एक गंभीर समस्या आहे. आम्ही त्या काळात असह्य वेदनेतून गेलो आहोत जेव्हा आमचा मुलगा NICU मध्ये होता आणि दुसऱ्याच्या अंत्यसंस्कारांची तयारी सुरू होती. आम्ही डॉक्टर्स आणि नर्स यांचे आभार मानतो की, आर्थर आमच्या घरी येऊ शकला.

पुढं सेलिना लिहिते की, अनेक प्रीमॅच्योर बेबीज पूर्ण आयुष्य मेडिकल चॅलेंजेस सोबत जगतात. तर काही पूर्ण निरोगी असतात. काही तर विंस्टन चर्चिल (Winston Churchill) आणि अल्बर्ट आइंस्टीन (Albert Einstein) आणि हो आमचा मुलाग आर्थर जेटली हेग सारखे फेमस व्यक्तिमत्वही बनतात. आर्थर साठी आपल्या प्रार्थना आणि आशीर्वाद असेच कायम असू द्या. प्रीमॅच्योर बेबींची काळजी कशी घ्यावी याबद्दल वाचन सुरू ठेवा.

सेलिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं सीजन्स ग्रीटींग या सिनेमातून लग्नानंतर अ‍ॅक्टींगमध्ये धमाकेदार कमबॅक केलं आहे.