’83’ चं फायनल ‘मोशन’ पोस्टर लॉन्च, बॉलिवूडच्या ‘कपिल’च्या पुर्ण टीमला इथं भेटा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग आजकाल इंडस्ट्रीतील सर्वात बिझी अभिनेत्यामधील एक आहे. रणवीर सतत शूटिंगमध्ये बिझी असतो, त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. रणवीर आपल्या चित्रपटांच्या व्यक्तिरेखेसाठीही खूप मेहनत घेतो. आजकाल रणवीर त्याच्या आगामी ’83’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या स्टारकास्टचा पहिला लूक प्रदर्शित केला गेला. आता त्याचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे, ज्यात संपूर्ण ’83’ टीम दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान आहेत.

चित्रपटाची घोषणा आणि पोस्टर लाँचिंगसाठी चेन्नईमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चित्रपटाचे मोशन पोस्टर चेन्नई येथे चित्रपटाचे मुख्य अभिनेते रणवीर सिंग यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले होते, तेथे चाहत्यांसह कपिल देव आणि दक्षिणचा सुपरस्टार कमल हासनसुद्धा उपस्थित होते. भारताच्या 71व्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी प्रदर्शित करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये संपूर्ण टीम दिसली असून त्यांच्या बॅकग्राऊंडला तिरंगा दिसत आहे.

या चित्रपटात रणवीर सिंग भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ताहिर राज भसीन सुनील गावस्करची भूमिका साकारणार आहेत. श्रीकांतची भूमिका जीवा, मोहिंदर अमरनाथ म्हणून साकीब सलीम, यशपाल शर्मा म्हणून जतिन सरना, संदीप पाटील म्हणून चिराग पाटील, कीर्ति आझाद म्हणून दिनकर शर्मा, रॉजर बिन्नी म्हणून निशांत दहिया, मदन लाल म्हणून हार्दिक संधू, सैय्यद किरमानी म्हणून साहिल खट्टर, बलविंदरसिंग संधू म्हणून ऐमी विर्क, दिलीप वेंगसरकर म्हणून आदिनाथ कोठार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रवी, रवि शास्त्रीची भूमिका धायरा करवा, सुनील वाल्सनच्या भूमिकेत आर बद्रि आणि पीआर मान सिंगच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार आहे.

कपिल देवची पत्नी रोमी देवच्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार आहे. रणवीरच्या या नव्या पोस्टरला चाहत्यांकडून खूप कौतुक मिळत आहे. हा चित्रपट 1983 च्या क्रिकेट वर्ल्ड कपवर आधारित आहे, जेव्हा भारताने प्रथमच विश्वचषक जिंकला होता. हा चित्रपट 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.