पुतणीनं भावावर केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर आता नवाजुद्दीन सिद्दीकीनं सोडलं मौन ! म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन –  बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या भावावर नवाजच्या पुतणीनं लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, सदर पीडितेनं दिल्लीच्या जामिया नगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रारदेखील दाखल केली आहे. हे प्रकरण तेव्हाचं आहे जेव्हा ती 9 वर्षांची होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर याची नवाज आणि त्याच्या कुटुंबाची खूप चर्चा होताना दिसत आहे. या सगळ्यावर नवाजचा भाऊ शमास सिद्दीकी यानं मौन सोडत अलीकडेच यावर प्रतिक्रिया दिली होती. यानंतर आता खुद्द नवाजुद्दीन सिद्दीकी यानं यावर भाष्य केलं आहे.

नवाजला एक वृत्तपत्रानं या सगळ्यावर प्रतिक्रिया विचारली असता तो काहीही बोलण्याच्या मूडमध्ये दिसला नाही. नवाज म्हणाला, “तुमच्या काळजीसाठी धन्यवाद. परंतु मी यावर काही कमेंट नाही करू शकत.”

एका इंग्रजी वृत्तानुसार, नवाजुद्दीनच्या पुतणीनं सांगितलं की, “हे प्रकरण खूप जुनं आहे. त्यावेळी मी 9 वर्षांची होते. मी दोन वर्षांची असतानाच माझ्या पालकांचा तलाक झाला होता. वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि मी माझ्या सावत्र आईसोबत राहू लागले. तेव्हा मी खूप लहान होते. मला जास्त काही समज नव्हते . माझ्यासोबत हिंसाचारही झाला आहे. मी मोठी झाले तेव्हा मला जाणीव झाली की, माझ्या अंकलनं(काकानं) माझ्यासोबत दुष्कृत्य केलं होतं. त्यांच्या प्रत्येक स्पर्श चुकीच्या इंटेनशचा होता.”

नवाजची पुतणी असं म्हणाली, “मी कोर्ट मॅरेज केलं. परंतु लग्नानंतरही मला आणि माझ्या सासरच्यांना वैताग दिला गेला. .यात माझे पप्पा आणि मोठे पप्पा (नवाजुद्दीन) सहभागी आहेत. त्यांनी माझ्या सासरच्या मंडळींवर खोट्या केस दाखल केल्या. जर त्यांनी त्यावेळी कठोरता दाखवली असती तर एवढं सगळं झालं नसतं. त्यावेळी कोणी माझ्यावर विश्वास नाही ठेवला. आताही प्रत्येक 6 महिन्यानंतर पप्पा केस दाखल करतात. मला विश्वास आहे की आता माझ्या तक्रारीनंतरही ते काही ना काही करतील.”