अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीला हवाय ‘तलाक’, ‘या’ 6 सेलिब्रिटींच्या घटस्फोटानं सारेच झाले होते ‘शॉक’

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया हिनं आता तलाक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिनं नवाजला व्हॉट्स अ‍ॅप आणि ईमेलच्या माध्यमातून नोटीस पाठवली आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक घटस्फोट याआधीही समोर आले आहेत ज्यामुळं सर्वजण चकित झाले आहेत.

1) अरबाज-मलायका – मार्च 2016 मध्ये अरबाज खान आणि मलायका अरोरा वेगळे झाल्याची बातमी समोर आली होती. मे 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. प्रत्येक बाजूनं परफेक्ट वाटणारं हे नातं 19 वर्षच टिकलं. 1988 मध्ये दोघं विवाहबद्ध झाले होते. अरबाज आता जॉर्जियाला आणि मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे.

2) अर्जुन-मेहर – अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया यांनी 2018 साली वेगळं होण्याची घोषणा केली होती. त्यांच्या लग्नाला 20 वर्षे झाली होती. गेल्यावर्षी दोघांनी घटस्फोट घेतला. अर्जुन आता गॅब्रिएलासोबत नात्यात आहे.

3) हृतिक-सुजैन – सुजैन खान हृतिक रोशनचं लहानपणापासूनचं प्रेम होतं. पिक्चर परफेक्ट वाटणारं हे कपल डिसेंबर 2013 मध्ये वेगळं झालं. डिसेंबर 2000 मध्ये कपल विवाहबद्ध झालं होतं. नोव्हेंबर 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

4) फरहान-अधुना – 16 वर्ष संसार केल्यानंतर फरहान अख्तर यानं पत्नी अधुना भबानी हिच्यापासून घटस्फोट घेतला. मुंबईच्या बँडस्टँडमध्ये असलेल्या 10 हजार स्क्वे. फूटाच्या बंगल्यात ते रहात होते. 2000 साली दोघांनी लग्न केलं होतं. 2016 मध्येच त्यांनी वेगळं होण्याची घोषणा केली होती आणि त्याच वर्षी दोघं वेगळे झाले होते. फरहान आता सिंगर आणि होस्ट शिवानी दांडेकर हिच्यासोबत नात्यात आहे.

5) आमिर-रीना – जेव्हा आमिर खान सुपरस्टार नव्हता तेव्हा त्यानं रीना दत्ता सोबत लग्न केलं होतं. 1986 मध्ये कयामत से कयामत तक रिलीज झाल्यानंतर आमिरनं रीनासोबत लग्न केलं होतं. यासाठी त्यानं खटापटी केल्या होत्या. 2002 मध्ये मात्र आमिरनं घटस्फोटाचा निर्णय घेतला. डिसेंबर 2005 मध्ये त्यानं लगानमध्ये असिस्टंट डायरेक्टर असलेल्या किरण रावसोबत लग्न केलं.

6) सैफ-अमृता – सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचं लग्न सर्वात चर्चित लग्नांपैकी एक होतं. 21 व्या वर्षीच त्यानं 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्री अमृता सिंह सोबत लग्न केलं होतं. यानंतर सारेच अवाक् झाले होते. हे लग्न फक्त 13 वर्षे टिकलं. 1991 मध्ये त्यांनी लग्न केलं आणि 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सैफनं करीना कपूर सोबत दुसरं लग्न केलं.