Video : ‘सिंगर’ नेहा कक्करनं शेअर केला हनिमून रूममधील व्हिडिओ ! मुलाचा उल्लेख करताना दिसली

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    फेमस सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि पंजाबी सिंगर रोहनप्रीत सिंग (Rohanpreet Singh) हे दि. 24 ऑक्टोबर (शनिवार) रोजी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. दोघांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते, जे सोशलवर खूप व्हायरल झाले होते. सध्या नेहा तिचं हनिमून एन्जॉय करत आहे. आता त्यांच्या हनिमून ट्रीपचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. तिनं तिच्या हॉटेल रूममधील एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CHPglnUD4tq/

नेहानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिच्या हनिमूनच्या हॉटेल रूममधील आहे. या व्हिडिओत ती रोहनप्रीत सिंगचं अलीकडेच रिलीज झालेलं एक्स कॉलिंग गाण्यावर लिप्सिंग करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CHe4xqnjOgw/

व्हिडिओ शेअर करताना नेहानं तिचं रोहनवरील प्रेमही व्यक्त केलं आहे. व्हिडिओत ती बेडवर बसली आहे. आणि गाण्यावर लिप्सिंग करत अ‍ॅक्टिंग करताना दिसत आहे. चाहत्यांनाही तिचा हा अंदाज खूप आवडला आहे.

https://www.instagram.com/p/CHhZvGzDRb3/

सध्या नेहाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी नेहाचा हा व्हिडिओ शेअरदेखील केला आहे.

https://www.instagram.com/p/CHMxnX7jflL/