‘सुशांतला घेऊन रिया तांत्रिकाकडे जात असे’, अभिनेत्याच्या बहिणीचा खळबळजनक आरोप

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीनं सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर चकित करणारे आरोप केले आहेत. रिया आणि तिच्या आईनं सुशांतला एका तांत्रिकाकडे नेलं होतं असा सुशांतच्या बहिणीचा आरोप आहे. बिहारमध्ये रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल झाल्यांतर या प्रकरणी अनेक चकित करणारे खुलासे समोर येत आहेत. आता प्रकरणी मुंबई पोलिसांच्या मदतीनं बिहार पोलिसांनीही हस्तक्षेप केला आहे. ते आता या प्रकरणी तपास करत आहेत.

एका वृत्तवाहिनीनं सोशल मीडियावर सुशांतच्या बहिणचा व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिनं चकित करणारे खुलासे केले आहेत. रिया आणि तिची आई सुशांतवर काळी जादू करत होत्या असं ती म्हणाली आहे. बिहार पोलिसांना आपलं स्टेटमेंट देताना सुशांतच्या बहिणीनं हे सर्व सांगितलं आहे. रिया बेपत्ता असल्याचंही बोललं जात आहे. रिया आणि तिचे कुटुंबीय भूमीगत असून बिहार पोलिसांच्या संपर्कात नसल्याचंही सांगतिलं जात आहे.

या व्हिडीओत असंही सांगण्यात आलं आहे की, जर रिया स्वत:हून हजर झाली नाही तर तिच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं जाईल. अंकितानंही या प्रकरणी जबाब दिल्याचं सागितलं जात आहे.