Video : सुष्मिता सेनची मुलगी ‘रिनी’नं पहिल्या सिनेमाचा ट्रेलर शेअर करत केला खुलासा ! म्हणाली – ‘अ‍ॅक्टिंगसाठी आईनं ठेवल्या होत्या ‘या’ 2 अटी’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिनं कालच (दि. 19 नोव्हेंबर) तिचा 45 वा वाढदिवस साजरा केला. तिचा जन्म 19 नोव्हेंबर 1975 साली हैदराबादमध्ये झाला आहे. सुष्मिताची मुलगी रिनी सेन (Renee Sen) हिनं या निमित्तानं तिच्या पहिल्या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर रिलीज करत तिने गिफ्ट दिलं आहे. सुट्टाबाजी असं या शॉर्ट फिल्मचं नाव आहे. एका लाईव्ह चॅटमध्ये बोलताना रिनी हिनं सांगितलं होतं की, जेव्हा तिनं आईला अ‍ॅक्ट्रेस होण्याची इच्छा बोलून दाखवली होती तेव्हा आईनं तिच्या समोर 2 अटी ठेवल्या होत्या.

रिनी म्हणाली, मी भाग्यवान आहे की, मीदेखील या क्षेत्रात आहे. मी 6 महिन्यांची होते तेव्हापासून तिच्यासोबत सेटवर जात होते. जेव्हा मी तिच्यासोबत मैं हूं ना आणि मैने प्यार क्यों किया या सिनेमांच्या सेटवर गेले होते तेव्हा डान्स, गाणी आणि डायलॉग्स पाहून मला हेच वाटलं होतं की, मलासुद्धा लाईफमध्ये हेच करायचं आहे.

रिनी पुढं म्हणते, मी जेव्हा आईला सांगितलं की, मला अ‍ॅक्ट्रेस व्हायचं आहे तेव्हा तिनं माझ्यासमोर 2 अटी ठेवल्या. पहिली म्हणजे ग्रॅज्युएशन करणं आणि दुसरी म्हणजे जे काही करायचं ते स्वत: करायचं. मी दोन्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.

सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर सुट्टाबाजी हा सिनेमा डिजिटली रिलीज होणार आहे. कधी आणि कुठे याबाबत माहिती समोर आलेली नाही. डायरेक्टर कबीर खुराना या सिनेमातून डायरेक्शनमध्ये डेब्यू करणार आहेत.

 

You might also like