Bones Problem | 3 चुकीच्या सवयींमुळे हाडे होतात कमजोर, अकाली येईल वृद्धत्व, लवकर सुरू करा ‘हे’ महत्वाचे काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bones Problem | सध्याच्या युगात कमी वयातच लोकांची हाडे कमकुवत होत आहेत. मोठ्या संख्येने तरुण हाडांच्या समस्यांशी झुंजत आहेत. हाडे आणि सांधे मजबूत करण्यासाठी, नियमित शारीरिक हालचालींसह कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे (Tips To Strengthen Bones).

ग्रेटर नोएडा येथील फोर्टिस हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक कन्सल्टंट डॉ. अंकुर दास म्हणतात की, चुकीच्या सवयी आणि कमी हालचाल तसेच कॅल्शियम आणि व्हिटॅमिनयुक्त पौष्टिक पदार्थ न खाल्ल्याने हाडे कमकुवत होतात. साखर आणि अनहेल्दी फॅट युक्त जंक फूड खाल्ल्याने सांध्यांना सूज, वेदना आणि जडपणा येतो. एकुणच अनहेल्दी लाइफस्टाइल, जंक फूडचे सेवन आणि कॅल्शियम आणि व्हिटॅमिन युक्त पदार्थ न खाण्याने कमी वयात हाडे कमकुवत होत आहेत. या तीन चुकीच्या सवयी हाडांच्या आरोग्यासाठी घातक आहेत. (Bones Problem)

वाहनांचा वापर वाढल्याने शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. त्यामुळे ऑर्थोपेडिक समस्या वाढत आहेत.
मस्कुलोस्केलेटल समस्यांचा धोका कमी करण्यासाठी शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत. सक्रिय नसल्याने स्नायू कमकुवत होतात. सांध्यांवर अतिरिक्त दाब पडू लागतो.

शरीराच्या वाढीसाठी सकस आहार आवश्यक असेल तर शरीर मजबूत ठेवण्यासाठी व्यायामाची गरज आहे.
वेळीच हाडांची आणि सांध्यांची काळजी न घेतल्यास वयानुसार वेदना आणि हालचालीच्या समस्या उद्भवू शकतात.

शरीराची हाडे आणि सांधे मजबूत ठेवण्यासाठी, हेल्दी फूड खा, खेळा,
धावा आणि मनोरंजक शारीरिक हालचालीत सहभागी व्हा. यामुळे हाडे दीर्घकाळ मजबूत राहतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cough Problem | सर्दीत औषध घेणे किती योग्य किंवा किती दिवसानंतर उपचार करावा सुरू?

Prostate Cancer च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात 43 टक्के पुरुष, तुम्ही करू नका ‘ही’ चूक

Constipation | मॅग्नेशियम बद्धकोष्ठता दूर करण्यात परिणामकारक उपाय आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण,
लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी