COVID-19 : बोनी कपूरच्या घरी काम करणाऱ्याला ‘कोरोना’ची लागण !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोनाचा हाहाकार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अद्याप यावर हवा तसा कंट्रोल मिळालेला नाही. तरीही सरकार आणि जनता मिळून याच्याशी लढा देत आहे. तरीही अनेक प्रकरणं समोर येत आहेत. प्रोड्युसर बोनी कपूर यांच्या लोखंडवाला मधील ग्रीन एकर्स घरात डोमेस्टीक हेल्प देणारा एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव असल्याचं समजत आहे.

या व्यक्तीचं नाव आहे चरण साहू. 23 वर्षीय चरण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं आहे. शनिवारी (दि 16 मे) रात्री त्याला बरं वाटत नव्हतं. बोनी कपूर यांनी त्याला टेस्टसाठी पाठवलं आणि आयसोलेट केलं. तपासणी केल्यानंतर जेव्हा त्याचे रिपोर्ट आले तेव्हा लगेच याची माहिती बीएमसीला आणि स्टेट गोवर्नमेंटला देण्यात आली. यानंतर लगेच साहूला क्वारंटाईन सेंटरला नेण्यात आलं.

काय म्हणाले बोनी कपूर ?
बोनी यांनी याबाबत स्टेटमेंट जारी करत सांगितलं की, मी, माझी मुलं आणि घरातील इतर सर्व स्टाफ ठिक आहे. आमच्यात कसलीही लक्षणं नाहीत. लॉकडाऊन आहे तेव्हापासून आम्ही घराच्या बाहेर पडलोच नाही. तात्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकार आणि बीएमसीचे आभारी आहोत.”