भाजपा सत्तेचा दावा करणार नाही ! शिवसेनेची सत्तेच्या दिशेने ‘आगेकूच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेकडून कोणताही सिग्नल मिळत नसल्याने सत्ता स्थापनेचा कोणताही दावा न करण्याचा निर्णय दिल्लीत झाल्याचे समजत आहे. त्यामुळे आता राज्यपालांपुढील एक पर्याय कमी झाला असून शिवसेनेने सत्ता स्थापन करण्याचा दावा केल्यास त्यांना संधी देणे किंवा
राष्ट्रपती  राजवट असे दोन पर्याय राहिले आहेत.

शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मावळते मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करण्यास उत्सुक असल्याचे दिसून येऊ लागले आहे. २०१४ मध्ये भाजपाला बहुमत नसताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विधानसभेत आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला बरोबर घेतले होते. मात्र, आता २०१९ मध्ये भाजपाच्या जागा कमी झाल्या आहेत. बहुमतासाठी लागणाऱ्या १४५ जागांची जुळवा जुळव भाजपाला आता शक्य नाही़ हे दिसून आले आहे.

सर्वात मोठा पक्ष म्हणून त्यांना मंत्रीमंडळ बसविता येऊ शकेल पण ते १५ दिवसांपेक्षा अधिक काळ टिकणार नाही. त्यातून भाजपाला आणखीच नाराजी सहन करावी लागेल, हे लक्षात आल्याने भाजपाने आता सत्ता स्थापन न करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

यामुळे आता पुन्हा निवडणुका नको किंवा राष्ट्रपती राजवट नको म्हणून शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेस आणि राष्ट्रपती काँग्रेसला कारण मिळाले आहे. त्यामुळे शिवसेनेची सत्तेच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

Visit : Policenama.com