पाटण्यातील एका घरात ‘बॉम्ब’स्फोट, अनेक जण जखमी

पाटणा : वृत्तसंस्था – पाटण्यातील गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत बॉम्बस्फोट झाला असून त्यात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दलदली रोडवरील एका घरात बॉम्बस्फोट झाला आहे.
हा बॉम्बस्फोट इतका जोरदार होता की त्यात दोन घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की तो सुमारे ५ किमीपर्यंत ऐकायला गेला.या बॉम्बस्फोटात ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर पीएमसीएच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर आहे.या बॉम्बस्फोटामुळे घराच्या भिंती पडल्या असून दरवाजा तुटून पडला आहे.

परिसरातील अनेक घरांच्या खिडक्यांचा काचा फुटल्या आहेत. या बॉम्बस्फोटामुळे परिसरात घबराट उडाली आहे.या स्फोटात जखमी झालेल्यांना बॉम्बचे तुकडे लागले आहे. घराच्या ज्या भागात हा स्फोट झाला तेथे ३ महिन्यांपासून एक भाडेकरु रहात असून तो रिक्षा चालवत असल्याचे घरमालकाने सांगितले.