बहिणीच्या प्रेमप्रकरणाने संतापलेल्या भावाने गुप्तांगात गोळ्या झाडून केली हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील मेरठ येथे बहिणीच्या प्रेमप्रकरणाने संतापलेल्या भावाने अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आहे. प्रेमप्रकरणावरून झालेल्या भांडणातून चुलत भावाने तरुणीचा गुप्तांगात गोळ्या झाडल्या. मिळालेल्या माहितीनुसार, टिना चौधरी असे या मृत पीडितेचं नाव असून तिच्या हत्येप्रकरणी तिचा भाऊ, आई-वडील यांच्यासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी टिनाला तिच्या कुटुंबीयांनी गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिला मृत म्हणून घोषित करत पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात तिच्या जांघेत, गुप्तांगात आणि कमरेच्या वर तीन गोळ्या लागल्याच उघडकीस झालं. त्यामुळे कुटुंबाचा पितळ उघड पडलं. त्यांनतर पोलिसांनी तिच्या घराची तपासणी केली असता घरात रक्ताचे डाग आणि ते पुसायचा प्रयत्न केल्याचं आढळलं. सोबतच बाजूला काचेच्या बांगड्यांचे तुकडे पडल्याचंही दिसून आलं. त्यामुळे संशय अधिकच दाट झाला. याप्रकरणी पोलिसांनी कुटुंबाची कसून चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.

माहितीनुसार, टीना हिचे गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र, तिचे कुटुंबीय त्या विरुद्ध होते. ज्यामुळे कुटुंबात वाद निर्माण झाला. रविवारी तिचे काका आणि तिचा चुलतभाऊ घरी आले होते. तिचा चुलतभाऊ प्रशांतने प्रियकराशी असलेले संबंध संपविण्यास सांगितलं. पण, टीनाने प्रियकराशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. ज्यांनंतर झालेल्या कडाक्याचं भांडणात संतापलेल्या प्रशांतने तिच्या गुप्तांगात गोळ्या झाडल्या. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

You might also like