दात स्वच्छ करताना करु नका ‘या’ चुका, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  नुकत्याच झालेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, माऊथ वॉशमुळे कोविड – 19 चा धोका कमी होऊ शकतो. दरम्यान, माउथवॉशपासून कोरोना विषाणूचा प्रसार आपण किती प्रमाणात रोखू शकतो? याबद्दल काहीही स्पष्ट केले गेले नाही, परंतु निरोगी शरीरासाठी माउथवॉश आणि ब्रश करण्याच्या पद्धतींची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. ब्रश करताना आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे बर्‍याच रोगांचा धोका वाढतो. तोंड स्वच्छ न केल्यामुळे असे बरेच व्हायरस आपल्या शरीरात जातात जे आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात.

दात घासून आपण त्याच्यावर जमा झालेले प्लाक आणि घाण साफ करू शकतो. यासह, ब्रश केल्याने दातांतील बॅक्टेरिया आणि कॅव्हिटीज देखील साफ होतात. म्हणूनच, लहानपणापासूनच मुलांना ब्रश करण्यास प्रोत्साहित केले जाते. योग्यरित्या ब्रश करणे केवळ मुलांसाठीच नाही तर वडीलजनांसाठी देखील महत्वाचे आहे. कारण, दातांची काळजी प्रत्येक वयात व्यवस्थित केली पाहिजे. जाणून घेऊया दात घासताना आपण काय चुका करतो…

दात घासताना करु नका या चुका –

अधिक जोर देऊन ब्रश करण्यासाठी सवय :

दात स्वच्छ करताना अधिक जोर देऊन ब्रश केल्याने आपल्या दातांचे आरोग्य सुधारत नाही. त्याऐवजी, जोर लावून दात घासल्याने आपले टूथ इनॅमल आणि आपल्या हिरड्यांच्या टिश्यूचे नुकसान होऊ शकते, विशेषत: जेव्हा आपण एखाद्या कठोर टूथब्रशने दात स्वच्छ करत असाल.

खूप कमी किंवा जास्त काळ ब्रश करणे

आपण दातांची स्वच्छता दिवसातून किती वेळा आणि किती वेळ करावी, याबद्दल लोक नेहमी गोंधळात पडतात. जर आपणही यात संभ्रमित असाल तर आपण दिवसातून 2- 3 वेळा आपले दात स्वच्छ केले पाहिजे. तसेच, कधीही 2-3 मिनिटांपेक्षा जास्त ब्रश करू नका.

चुकीच्या मार्गाने ब्रश करणे

बहुतेकदा लोकांना दात घासण्याचा योग्य मार्ग काय आहे हे माहित नसते. म्हणूनच, येथून समस्या सुरू होते. अशा परिस्थितीत आपले तोंड 4 भागांमध्ये विभाजित करा आणि प्रत्येक बाजू, प्रत्येक कोपऱ्यातील सर्व पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक भागाला कमीतकमी 30 सेकंद ब्रश करा. दाताच्या बाह्य, आतील आणि चावणाऱ्या पृष्ठभागावर ब्रश करा. लक्षात ठेवा, वरपासून खालपर्यंत ब्रश करताना दात आणि हिरड्यांना एकत्र ब्रश करू नका, कारण यामुळे आपल्या हिरड्या खराब होऊ शकतात आणि दातांवर ओरखडे पडू शकतात. तसेच, आपली जीभ देखील स्वच्छ करा, कारण जिभेच्या कोपऱ्यात आणि फटीत जीवाणू वाढू शकतात.

या टिपांसह दात ठेवा सुरक्षित

– फ्लॉस किंवा इंटरडेंटल ब्रश वापरा. हलक्या हातांनी दिवसातून एकदा दातांच्या वर आणि खालच्या बाजूची सफाई करा. रात्री फ्लॉस वापरणे चांगले. आपण कडुलिंबाच्या काडीनेही दात स्वच्छ करू शकता.

– फ्लोराईड असलेली टूथपेस्ट वापरा. हे दातांवर इनॅमलचा थर टिकवून ठेवत कॅविटीला हटविते.

– सॉफ्ट ड्रिंक्स, पॅकेज्ड फळांचा रस, साखरयुक्त पदार्थ आणि आम्लयुक्त रस मर्यादित प्रमाणात प्या. जास्त कँडी आणि चॉकलेट खाऊ नका.

– दंतचिकित्सकांच्या सल्ल्यानुसार दर सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा दात स्केलिंग करण्याचे सुनिश्चित करा. हे हिरड्या निरोगी आणि मजबूत ठेवेल. जर दातांत पोकळी तयार झाली तर लगेच कळेल आणि दात इतर आजारांपासून सुरक्षित असतील.

– दात ट्रान्सप्लांट करणार्यांनी नियमित स्वच्छतेसाठी दंतवैद्याकडे जावे.

– कृत्रिम दात स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट वापरू नका. वाहत्या नळाच्या पाण्याखाली कोमल साबणाने स्वच्छ करा. नियमितपणे डेंचर्सची स्वच्छता करा.