फायद्याची गोष्ट ! BSNL चा जबरदस्त प्लॅन, तब्बल 90 दिवसांपर्यंत दररोज मिळणार 5GB डेटा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. तर काही लोक घरीच बसून आहेत. यापार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) नवीन वर्क फ्रॉम होम प्लॅन युजर्ससाठी आणला आहे. कंपनीने 599 रुपयांचा प्रीपेड एसटीव्ही प्लॅन आणला असून यामध्ये रिचार्ज केल्यानंतर युजर्सला 5GB डेटा मिळणार आहे.

BSNL कंपनीचा 599 रुपयांचा वर्क फ्रॉम होम एसटीव्ही प्लॅन देशात कुठेही रिचार्ज करू शकतात संपूर्ण देशभरात हा प्लान उपलब्ध आहे. 599 रुपयांचा प्रीपेड एसटीव्ही या प्लॅनमधून रिचार्ज केल्यावर ग्राहकाला दररोज 5GB चा डेटा दिला जाणार आहे. या नव्या 599 रुपयांच्या प्लॅनची मर्यादा 90 दिवसांची आहे. यासोबत यामध्ये फ्री व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस दिले जाणार आहे. याआधीही बीएसएनएलने 551 रुपयांचा प्लॅन बाजारात आणला होता. मात्र, त्या प्लॅनचा फायदा केवळ आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील युजर्सला मिळत होता.

अनलिमिटेड फ्री कॉलिंग

551 रुपयांच्या प्लॅनमध्ये फक्त डेटा दिला जात होता. मात्र आता 599 रुपयाच्या नवीन प्लॅनमध्ये एसटीव्हीला अनलिमिटेड कॉम्बो प्लॅन म्हणून घोषित केले आहे. या प्लॅनच्या माध्यमातून देशभरात सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंगचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच दररोज 250 मिनिटे युजर्सला मिळणार आहेत. याचप्रमाणे 5GB हायस्पीड डेटा आणि 100 फ्री एसएमएसही मिळणार आहेत.

एकूण 450 GB हायस्पीड डेटा

बीएसएनएलच्या या नव्या प्लॅनच्या मदतीने देशभरातील सर्व सर्कलमध्ये रिचार्ज केले जाऊ शकते. 5GB हायस्पीड डेटा संपल्यानंतर स्पीडमध्ये घट होऊन 80 KBPS राहणार आहे. त्यामुळे या प्लॅनला वर्क फ्रॉम होम म्हटले आहे. कारण यामध्ये खूप डेटा दिला जात आहे. 90 दिवसांच्या मर्यादेमध्ये 450 GB डेटा युजर्सला मिळणार आहे.