Builder Amit Lunkad | फसवणूक प्रकरणात येरवडा जेलमध्ये असलेल्या बिल्डर अमित लुंकडच्या जामीनावर मंगळवारी निर्णय, आज झाला युक्तीवाद

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केल्यानंतर सध्या येरवडा कारागृहात असलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड (Builder Amit Lunkad) यांच्या जामिनाचा मंगळवारी निर्णय होणार आहे. आज न्यायालयात (Court) जामिनावर सुनावणी झाली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) संजय होनराव (वय 48) (Sanjay Honrao) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लुंकड रियालिटी (Lunkad Realty) फर्मचे अमित लुंकड (Amit Lunkad) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या (Pune Police) खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell) त्यांना अटक केली होती. अटकेनंतर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) रवानगी केली होती. दरम्यान, त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज (Bail Application) केला आहे. आज न्यायालयात जामिनावर सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील सुनील हांडे (Sunil Hande) यांनी जमिनीला विरोध करताना ‘फसवणूकीचा आकडा वाढला आहे. फसवणूक झालेले व्यक्ती आता समोर येऊ लागले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर फसवणूक झालेल्या व्यक्तींना पैसे परत देण्यात येत आहेत. मात्र, अद्यापही गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आता त्यांना जामीन दिला तर ते दबाव आणू शकतात. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, असा युक्तिवाद केला. जामिनावर उद्या (मंगळवारी निर्णय) होणार आहे.

25 लाखाचे फसवणूक प्रकरण
यातील फिर्यादी संजय हे अमित लुंकड (Amit Lunkad) यांना भेटले असता त्यांना अमित यांनी गुंतवणूक केल्यास 15 टक्के परतावा देऊ असे आमिष दाखविले. लुंकड रिऍलिटी (Lunkad Realty) बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या फर्ममध्ये वेळोवेळी एकूण 25 लाख रुपये गुंतविले. पण, त्यातील काही रक्कम परत दिली. मात्र त्यानंतर फिर्यादी यांची 21 लाख 26 हजार 875 रुपये न देता फसवणूक केल्याने फिर्यादी संजय यांनी पुण्याच्या गुन्हे शाखेकडे (Pune Crime Branch) तक्रार केली होती. त्याची चौकशी करत गुन्हा दाखल करून तात्काळ अमित लुंकड (Amit Lunkad) याला अटक केली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रारी येण्यास सुरुवात झाली.

Web Titel :- Builder Amit Lunkad | Builder Amit Lunkad’s bail plea decided on Tuesday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नवी मुंबईतील भाजप नगरसेविका संगीत म्हात्रे यांच्यावर पतीवर प्राणघातक हल्ला; कोयत्याने केले सपासप वार

पुलवामात दहशतवादी हल्ला ! विशेष पोलीस अधिकार्‍याच्या घरात शिरुन केली हत्या, पत्नी, मुलीचाही मृत्यु

Twitter ला मोठा झटका, तक्रार अधिकार्‍याने दिला राजीनामा; काही दिवसापूर्वीच झाली होती नियुक्ती

Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक