बुलेट चोरणारा कोल्हापूरातील चोरटा गजाआड

चतुश्रृंगी पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात येऊन बुलेट दुचाकी चोरणाऱ्या कोल्हापूरातील सराईत चोरट्याला चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ४ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या ३ बुलेट दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

जमीर ईब्राहिम हर्चीकर (सुभाषनगर, सिरत मोहल्ला, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

चतुश्रृंगी पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्त घालत असताना पोलीस नाईक सारस साळवी यांना माहिती मिळाली की, हर्चीकर याने शहरातील अनेक ठिकाणांहून बुलेट दुचाकी चोरल्या आहेत. त्यानुसार तपास पथकाने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केल्यावर ३ बुलेट दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यांची किंमत ४ लाख ७० हजार रुपये असून अलंकार १, तर शिवाजीनगर १ असे २ गुन्हे उघड करण्यात आले आहेत.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक पोलीस आय़ुक्त देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) वैशाली गलांडे, सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम फड, कर्मचारी बाळासाहेब गायकवाड, मुकुंद तारू, एकनाथ जोशी, सारस साळवी, संतोष जाधव, प्रकाश आव्हाड, दादासो काळे, तेजस चोपडे, ज्ञानेश्वर मुळे, अमर शेख यांच्या पथकाने केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like