पुणे : जागतिक मधुमेह दिन साजरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिनस्त असलेल्या आयुर्वेदीक कक्षात आयुर्वेदीक कक्षाचे निवासी वैद्यकीय अधिकारी वैद्य व्यंकट धर्माधिकारी यांच्या अध्यक्षेतखाली जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास वैद्य समर्थ कोटस्थाने, प्रा. टिळक व रुग्णालयातील रुग्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

वैद्य समर्थ कोटस्थाने यांनी रुग्णांना भुक, तहान या नैसर्गिक संवेदना व त्यानुसारच आहार घेणे किंवा पाणी पिणे महत्त्वाचे आहे. शरीराचे स्वास्थ टिकवण्यासाठी आयुर्वेदीक दिनचर्या त्रतुचर्या यांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगतले.

आयुर्वेदिक विभागाचे प्रमुख वैद्य धर्माधिकारी यांनी मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवळा, हळद, गुळवेल अशा आयुर्वेदिक वनस्पतींचे घरगुती उपयोग सांगितले तसेच आयुर्वेद हे आयुष्याचे शास्त्र असून दैनंदिन व्यवहारात आयुर्वेदीक सुत्रांचे महत्त्व स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैद्य प्रतिक मेहता यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयुर्वेद विभागातील वैद्य सोनाली वाघुले, वैद्य गणेश आहेरकर, वैद्य नेहा भारती, सागर बनकर, शारदा अफुवाले, मिश्रक यांनी परिश्रम घेतले.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like