PM कन्या आयुष योजनेतंर्गत प्रत्येक मुलीला 2000 रूपये देतंय केंद्र सरकार ? जाणून घ्या ‘सत्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या काळात लोकांना भूरळ पाडणारा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेसेज मध्ये सांगितलं गेलं की पीएम कन्या आयुष योजनेंतर्गत प्रत्येक मुलीला केंद्र सरकार 2,000 देणार आहे. सांगितलं जात आहे की, या योजनेंतर्गत सरकार प्रत्येक मुलीच्या खात्यात हे पैसे ट्रान्सफर करणार आहे.

व्हायरल मेसेज मध्ये केलेला दावा निघाला खोटा
पीएम कन्या आयुष योजने संदर्भात व्हायरल झालेल्या मेसेज मध्ये हे सांगितलं गेलं नाही की या योजनेंतर्गत सरकार गरीब आणि वंचित मुलींना आर्थिक मदत करणार आहे. हा दावा पूर्णपणे खोटा असल्याची माहिती समोर आली आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने सांगितलं की केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना सुरु केली नाही. अशा खोट्या आणि चुकीच्या योजनांपासून सावध राहा. याद्वारे अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग केला जाऊ शकतो.

केंद्राने 2015 मध्ये सुरु केली होती सुकन्या योजना
केंद्र सरकारने 2015 मध्ये मुलींच्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरु केली होती. मुलीचं शिक्षण आणि त्यांचं भविष्य सुलभ बनवण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश दोन मुलीचं शिक्षण आणि लग्नाच्या वेळी आर्थिक मदत करण्याचा होता. पीआयबीने सांगितलं की पीएम कन्या आयुष योजना पूर्णपणे खोटी आहे. जर अशा प्रकारचे मेसेज किंवा पोस्ट तुमच्या समोर आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका. या योजनेच्या माहितीसाठी कोणतीही अधिकारिक वेबसाईट उपलब्ध नाही.

फेक मेसेज मध्ये अर्जात मागवली ही माहिती
पीएम कन्या आयुष योजने संदर्भात व्हायरल झालेल्या मेसेज मध्ये हे सांगितलं गेलं की या योजने अंतर्गत शाळेत शिकणाऱ्या मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचं बँकेत खातं असलं पाहिजे आणि तो आधार कार्डशी लिंक पाहिजे. यामध्ये मुलीचं वय 18 वर्षांच्या आत असायला हवं असं सांगितलं गेलं. योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या मुलीचं आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, बँक अकाउंट पासबुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो लागणार असं या फेक मेसेज मध्ये सांगण्यात आलं आहे.